Mahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल
महेंद्र सिंह धोनी और रणवीर सिंह (Photo Credits: Instagram/yogenshah_s)

फुटबॉलच्या मैदानात भारतीय क्रिकेट संघाचा (India National Cricket Team) माजी कर्णधार आणि बॉलिवूड अभिनेता धमाल मस्ती करतानाचा एक फोटो सोशल मीडियात व्हयरल झाला आहे. माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि बॉलीवुड स्टार रणवीर सिंह (Ranveer Singh) अशी या दोघांची नावे आहेत. मैदानातल्या मस्तीत एकमेखांची फिरकी घेत दोघेही एकमेकांची गळाभेट घेतानाही दिसत आहेत. मैदानातील एका क्षणाचा हा फोटो रणवीर संह याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यातील एका फोटोमध्ये धोनी आणि रणविरसिंह हे एका ठिकाणी बाकड्यावर निवात बसलेले दिसत आहेत.

आपल्या खास मजेशीर क्षणांचा फोटो शेअर करत रणबिरने त्याला 'बड़े भाई के चरणों में हमेशा' अशी कॅप्शनही दिली आहे. धोनी आणि रणवीर हे दोघेही ऑल स्टार्स फुटबॉल क्लबचा भाग आहेत. हा क्लब सेलिब्रिटीजमध्ये फुटबॉलचे सामने आयोजित करत लोकांच्या मदतीसाठी निधी जमा करतो. तसेच, देशात फुटबॉलला चालना देण्याचेही काम करतो. (हेही वाचा, The Big Picture Promo: 'द बिग पिक्चर' द्वारे Ranveer Singh करणार टीव्हीवर डेब्यू; समोर आला शोचा हटके प्रोमो (Watch Video))

धोनीने आयसीसी च्या माध्यमातून अनेक मोठ्या टूर्नामेंट जिंकल्या आहेत. सध्या तो इंटरनॅशनल क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झाला. आता तो आयपीएलमध्ये सक्रीय आहे. प्रतिष्ठीट टूर्नामेंटमध्येही तो चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचे नेतृत्व करतो. धेनीच्या क्रिकेट करिअरबाबत बोलायचे तर त्याने देशासाठी 90 टेस्ट क्रिकेट सामने खेळले. 144 डावांमध्ये सरासरी 38.1 च्या वेगात त्याने 4876 धावा ठोकल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 6 शतकं आणि 33 अर्धशकतकं आहेत. धोनीच्या नावावर सर्वाधिक 224 धावांची नोंद आहे. याशिवाय 350 एकदिवशीय सामन्यांमध्ये 297 डावांमधये सरासरी 50.6 च्या वेगाने 10773 धवा आणि 98 T20I क्रिकेट सामने खेळत 85 डवांमध्ये 37.6 च्या सरासरी वेगाने 1617 धावा केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

दरम्यान, धोनिच्या आयपीएल कामगिरीबाबत बोलायचे तर विविध संघांच्या माध्यमातून खेळत त्याने 211 सामन्यांमध्ये 186 डावांमध्ये 40.2 च्या सरासरी वेगाने 4669 धावा बनवल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 23 अर्धशतकं आहेत. शिवाय त्याने आपल्या यष्टीरक्षक म्हणून निभावलेल्या कारकिर्दीत टेस्ट क्रिकेटमध्ये 256 झेल, तीन रनआऊट आणि 38 स्टंपींग केले आहेत टेस्ट क्रिकेटशिवाय एकदिवशीय सामन्यांमध्ये 321 झेल, 22 धावबाद, 123 स्टंपींग आणि T20I क्रिकेट मध्ये 57 कॅच, आठ रन आउट आणि 34 स्टंपिंग केले आहेत.