Most Capped in IPL History: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यातील आयपीएलचा (IPL) 14वा सामना थोड्याच वेळात सुरु होईल. आजच्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी मैदानावर उतरताच सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) अनोख्या विक्रमाची नोंद केली आणि यासाठी त्याने त्याचा सीएसके सहकारी सुरेश रैनाना (Suresh Raina) पछाडले. धोनी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू बनला. हैदराबादविरुद्ध आजचा सामना धोनीच्या आयपीएल करिअरमधील 194 वा सामना आहे. रैनाने आयपीएलमध्ये 193 सामने खेळले आहेत. रैना सध्या आयपीएल 2020चा भाग नाही, अशा परिस्थितीत आजचा सामना खेळून धोनी सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे रैना आणि धोनी 2008 पासून सीएसकेकडून खेळत आहेत. इतकंच नाही. याशिवाय, धोनी यंदा 200 आयपीएल सामने खेळणारा पहिला खेळाडू बनू शकतो. (CSK vs SRH, IPL 2020: डेविड वॉर्नरने टॉस जिंकून घेतला बॅटिंगचा निर्णय; CSK प्लेइंग 11 मध्ये अंबाती रायुडू, ड्वेन ब्रावो यांची एंट्री)
धोनीने आपला विक्रम मोडीत काढताच रैनाने ट्विट करून त्याला शुभेच्छा दिल्या आणि म्हणाला, "आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनण्यासाठी अभिनंदन माही भाई. रेकॉर्ड त्या मोडल्यास यासाठी आनंद. आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा आणि मला खात्री आहे की सीएसके या हंगामात जिंकेल." त्याने सुरुवातीपासून सीएसकेचे नेतृत्व केले आणि त्याच्या नेतृत्वात टीमने 163 पैकी 100 सामने जिंकले आहेत. पाहा रैनाचे ट्विट:
Congratulations Mahi bhai (@msdhoni) at becoming the most capped IPL player. Happiest that my record is being broken by you. All the best for the game today and am sure @ChennaiIPL will win this season’s @IPL. pic.twitter.com/f5BRQTJ0aF
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) October 2, 2020
शिवाय, स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे सीएसकेवरील दोन वर्षाच्या बंदी दरम्यान धोनी 2016 आणि 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. धोनीने 2016 मध्ये पुणेचे नेतृत्व केले होते, पण टीमने पुढील वर्षी म्हणजे 2017 मध्ये कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथची निवड केली. दरम्यान, आजच्या सामन्यापूर्वी धोनी आणि रैनाने संयुक्तपणे 193 सामने खेळले होते. रैना आयपीएल 2020 चा भाग नसल्यामुळे धोनीच्या नावावर हा विक्रम किमान या मोसमात तरी कायम राहील. पण, जर सीएसके प्ले-ऑफ गाठले नाही आणि मुंबई इंडियन्स अंतिम-4मध्ये पोहचली तर रोहित शर्मा धोनीच्या विक्रमाच्या पुढे जाईल याच्या शक्यता आहे. रैना आणि धोनीनंतर रोहितने 192 आयपीएल सामने खेळले आहेत.