महेंद्र सिंह धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि डेविड वॉर्नरचे (David Warner) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात आयपीएल (IPL) स्पर्धेतील 14वा सामना थोड्याच वेळात सुरु होईल. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यात टॉस जिंकून एसआरएचने (SRH) पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. दोन्ही टीमने आजवर खेळलेल्या तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकला तर दोन सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएलच्या सध्याच्या गुणतालिकेत हैदराबाद 7व्या तर चेन्नई 8व्या स्थानावर आहेत. त्यामुळे दोन्ही टीम आजच्या सामन्यात विजय मिळवून आपली गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करतील. आजच्या सामन्यासाठी एकीकडे सीएसकेने (CSK) दोन बदल केले आहे, तर हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. (MS Dhoni Becomes Most Capped IPL Player: हैदराबादविरुद्ध मैदानात उतरताच एमएस धोनीचा अनोखा पराक्रम, बनला आयपीएलमधील सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू)
सीएसकेकडून अंबाती रायुडू प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. रायुडू दुखापतीमुळे सीएसकेकडून दुसऱ्या आणि सामन्यात खेळू शकला नाही. रायुडूचे पुनरागमन सीएसकेसाठी महत्वाचे आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध सलामीच्या सामन्यात 71 धावांचा डाव खेळला होता आणि टीमच्या विजयात मुख्य भूमिका बजावली होती. सीएसकेने ड्वेन ब्रावोला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले आहे. दुसरीकडे, हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोची जोडी पुन्हा एकदा हैदराबादकडून डावाची सुरुवात करतील.
पाहा चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादचा प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स: एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉट्सन, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, पियुष चावला, शार्दूल ठाकूर आणि सॅम कुरन.
सनरायझर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, केन विल्यमसन, प्रियम गर्ग, अब्दुल समद, रशीद खान, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि टी नटराजन.