MS Dhoni याच्यानंतर ‘हे’ असू शकतात CSK चे कर्णधार बनण्याचे दावेदार, ‘Mr IPL’ सुरेश रैना याने सुचवली चार दमदार खेळाडूंची नावे
एमएस धोनी आणि सुरेश रैना (Photo Credit: Instagram)

‘मिस्टर आयपीएल’ (Mr IPL) म्हणून प्रसिद्ध सुरेश रैना (Suresh Raina) याला इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 लिलावात एकही खरेदीदार सापडला नाही. यापूर्वी एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चार आयपीएल (IPL) जेतेपद जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) फ्रँचायझीचा सदस्य असलेला रैना लिलावात अनसोल्ड राहिला, पण 15 व्या हंगामात तो एका नवीन अंदाजात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून बराच काळ खेळणाऱ्या रैनाला यंदा कायम ठेवण्यात आले नाही. एमएस धोनी 2008 ते 2021 पर्यंत CSK चा कर्णधार होता. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आणि असे मानले जात आहे की तो एक-दोन वर्षांत व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, त्यामुळे रैनाने अशी चार नावे सुचवली आहेत, जी आगामी काळात CSKचा कर्णधार बनण्याचे दावेदार बनू शकतात. (IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जला विजयाचे ‘पंचक’ करायचे असल्यास ‘या’ 5 धुरंधर खेळाडूंवर असणार संघाची मदार)

आयपीएल 2022 च्या आधी स्टार स्पोर्ट्सशी संभाषण करताना रैना म्हणाला, “रवींद्र जडेजा, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा आणि ड्वेन ब्राव्हो आगामी काळात संघाचे नेतृत्व करू शकतात. ते सर्व सक्षम आहेत आणि खेळ चांगल्या प्रकारे समजतात. ते आगामी काळात धोनीची जागा घेऊ शकतो.” अनेक वर्षे सीएसकेचे प्रतिनिधित्व करणारा आणि आयपीएलमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या रैनाने पुढे सांगितले की, या खेळाडूंमध्ये विशेषतः जडेजाकडे संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. रैना 2011 क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. त्याने CSK सोबत चार वेळा इंडियन प्रीमियर लीग (IPL) ट्रॉफी जिंकली आहे. तसेच टी-20 मध्ये 6000 तसेच 8000 धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आणि IPL मध्ये 5,000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू होता. याशिवाय चॅम्पियन्स लीग टी-20 इतिहासात सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

आयपीएल 2022 साठी CSK संघ: एमएस धोनी (कॅप्टन), रवींद्र जडेजा, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्रावो, अंबाती रायुडू, दीपक चाहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महेश तीक्ष्णा, राजवर्धन हंगरगेकर, सिमरजीत सिंह, डेव्हन कॉन्वे, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, सुभ्रांशु सेनापती, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा.