Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) वर रात्री उशिरा चाकूने हल्ला करण्यात आला. त्यानंतरच अभिनेत्याला गंभीर अवस्थेत लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. सध्या त्यांची शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून अभिनेत्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचे सांगण्यात आले. (हेही वाचा - Saif Ali Khan Attacked: आरोपी सैफच्या घरात कसा घुसला? दोघांपैकी एकाची ओळख पटली; मुंबई पोलिसांनी केला खुलासा)
दरम्यान सैफ अली खानवरील आला आहे, ज्यामध्ये तो कॅमेऱ्याकडे पाहत पायऱ्यांवर उभा असल्याचे दिसत आहे. त्यावर दाखवलेल्या टाइमस्टॅम्पनुसार, हा फोटो रात्री 2:33 च्या सुमारास काढण्यात आला होता. सैफ अली खानवर रात्री उशिरा झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी बीएनएसच्या कलम 311, 312, 331(4), 331(6) आणि 331(7) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित दिसले आहेत. मुंबई पोलिस अधिकाऱ्याने दावा केला की, आरोपी त्यापैकी एक असू शकतो. पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आहे. यापैकी एका व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, संशयिताने शेजारच्या इमारतीवरून उडी मारून सैफ अली खानच्या इमारतीत प्रवेश केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले की, एका अज्ञात व्यक्तीने दुसऱ्या इमारतीच्या कंपाऊंडमधून सैफच्या इमारतीत प्रवेश केला.