सैफ अली खान (Saif Ali Khan) वर त्याच्या राहत्या घरी चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या व्यक्तीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी सैफवर सध्या वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज मधून संशयित मारेकर्याचा फोटो जारी केला आहे. पाठीच्या मणक्यात रूतलेला चाकूचा तुकडा आणि मानेवरील हल्ल्यानंतर लीलावती मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सध्या सैफ च्या जीवावरील धोका टळला आहे.
सैफ अली खान वांद्रे च्या लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल असताना आता त्याच्या एका चाहतीने लक्ष वेधून घेतलं आहे. ही चाहती हॉस्पिटल बाहेर एक फलक घेऊन उभी दिसली आहे. यावर तिने 'हम तुम' सिनेमाच्या पोस्टर सह दिसली आहे. तिने बॉलिवूड सिने निर्मात्यांना हिंसा असलेले सिनेमे न बनवण्याचं आवाहन यामधून केले आहे. 'हिंसा असलेले सिनेमे टाळा आणि अधिक लव्ह स्टोरीज बनवा' असं आवाहन करत तिने सैफच्या प्रकृतीमध्ये आराम पडावा अशी कामना देखील व्यक्त केली आहे.
पहा चाहतीचा मेसेज
View this post on Instagram
सध्या हॉस्पिटल मध्ये दाखल सैफ अली खानला भेटण्यासाठी अनेक कलाकार, कुटुंबातील मंडळी पोहचली आहेत. करिना कपूरची देखील अनेकांनी वांद्रे येथील तिच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, सैफला त्याचा मुलगा इब्राहिम खान लीलावती हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला.