Dead Cockroach Found in Sambar

South Indian Foods: भारतात प्रत्येक राज्याचे जेवण संस्कृती ही भिन्न आहे. त्या त्या भागातील अन्नपदार्थ त्या भागाची खासियत आहे. जसे राजस्थान म्हटले की, दाल बाटी चुरमा, गुजरात म्हटले की, फाफडा जलेबी, महाराष्ट्र म्हटले की, भाजी भाकरी... तसेच साउथ इंडिया म्हटलं की, इडली वडा सांबर आठवते. परंतु सांबर ही डिश मराठ्यांची देणगी आहे. आज दक्षिण भारतातला हा पदार्थ लोक आवडीने खातात आणि सांबार ही दक्षिण भारताची ओळख बनली आहे. पण सांभाराची खरी कथा ऐकून आणि तिचा शोध कसा आणि कुठून लागला ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे. प्रत्येक सुपरहिट कथेला जसा चित्रपटसृष्टीत ट्विस्ट असतो, तसाच सांबरच्या कथेतही जबरदस्त ट्विस्ट आहे. कल्पना करा हा चविष्ट पदार्थ जर "साऊथ इंडियन सुपरस्टार" असेल तर त्याचा खरा निर्माता होता "मराठा दिग्दर्शक"! संभाजी महाराज शहाजींच्या राजवाड्यात पोहोचले तेव्हा स्वयंपाकींनी त्यांच्यासाठी खास पदार्थ बनवायचे ठरवले, पण कोकम नसल्यामुळे चिंचेचा वापर केला गेला आणि एका चुकीमुळे "सांबर" हि नवीन डिश तयार झाली. हेही वाचा: Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din HD Images: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत Wishes, Messages, WhatsApp Status, Wallpapers शेअर करून करा शंभूराजेंना वंदन

सांबारची अनोखी कहाणी

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक मुलगी सांबरची कहाणी सांगत आहे. ती म्हणते की, दक्षिण भारतीयांचा आवडता सांबर ही खरं तर मराठ्यांची आहे. कथेनुसार, मराठा राजा शाहाजी १ ला आपल्या पाहुण्यांना स्वादिष्ट जेवण जेवु घालायला खूप आवडायचे. एकदा शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज त्यांना भेटायला गेले असता राजाने आमटी (मराठी पदार्थ) बनवण्याचा प्रयत्न केला, पण कोकम न मिळाल्याने त्यांनी त्यात चिंच टाकली. मुलगी हसते आणि म्हणते की, यानंतर "आग लागली आहे" म्हणजेच एक नवीन डिश तयार करण्यात आली आहे. संभाजी महाराजांच्या नावावरून या नव्या पदार्थाला "सांबर" असे नाव देण्यात आले. व्हिडिओच्या शेवटी मुलगी म्हणते की, कुणासोबतही खा, पण सांबार ही मराठ्यांची देणगी आहे हे विसरू नका.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Kavya Karnatac (@kk.create)

केके डॉट क्रिएट नावाच्या अकाऊंटने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "तुम्हाला सांबारमध्ये काय आवडते आणि हा पदार्थ मराठ्यांनी बनवला आहे." हा व्हिडिओ पाहून युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, 'मला आज कळलं', तर एका युजरने लिहिलं, 'छत्रपती संभाजी महाराज विजय आसो'.