Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din (File Image)

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din HD Images in Marathi: छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 साली झाला. पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून गादीवर विराजमान झाले. महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 16  जानेवारी 1681 साली झाला. आज राज्यभरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन (Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din) साजरा होत आहे.

गरिबांचे कैवारी, अनेक भाषांत विद्याविशारद, धुरंदर राजकारणी अशी ओळख असलेल्या संभाजी महाराजांनी राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेच भराभर आत्मसात केले होते. संभाजी महाराजांनी 1681 ते 1689 पर्यंत मराठा सम्राट म्हणून राज्य केले. (हेही वाचा: Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din 2025: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाची तारीख, इतिहास आणि महत्त्व)

अशा या थोर राजाला त्याच्या त्याच्या राज्याभिषेक दिनानिमित्त खास Wishes, WhatsApp Status, Wallpapers, Messages पाठवून करा वंदन.

 

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes

दरम्यान, संभाजी महाराजांच्या आई सईबाईंच्या निधनानंतर त्यांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली. राजकारणासोबत संभाजी राजेंचा साहित्याकडेही कल होता. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. त्यांनी बुधभूषण, नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ग्रंथ लिहिले होते. 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ होता, तर इतर ब्रज भाषेतले ग्रंथ होते.