Prabowo Subianto । X @Prabowo Subianto

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी President of Indonesia Prabowo Subianto प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये President of Indonesia चा कार्यभार हाती घेतल्यानंतर आता ते पहिल्यांदाच भारत भेटीवर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेले आमंत्रण त्यांनी स्वीकारल्याचं सांगण्यात आले आहे. त्यामुळे Prabowo Subianto हे 25-26 जानेवारीला भारतात स्टेट व्हिजिट साठी येणार आहेत. दिल्लीच्या राजपथावर होणार्‍या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होणार आहेत.

 

Prabowo Subianto यांच्या राजकीय प्रवासाची माहिती

इंडोनेशियाचे माजी संरक्षण मंत्री Prabowo Subianto यांची गेल्या वर्षी निवडणूक जिंकल्यानंतर राष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाली. माजी राष्ट्राध्यक्ष Joko Widodo यांच्यानंतर माजी स्पेशल फोर्स कमांडर राष्ट्राचे अध्यक्ष झाले आहेत. Prabowo Subianto यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष Joko Widodo यांचा मुलगा Gibran Rakabuming यांच्यासह इंडोनेशियाचे आठवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. Rakabuming यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली.

Prabowo Subianto हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदा येत असले तरीही इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री असताना Subianto 2020 मध्ये नवी दिल्लीला भेट दिली होती. इंडोनेशियन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी Subianto यांना मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांचा सामना करावा लागला होता, ज्याचा त्यांनी अनेकदा इन्कार केला होता. यावरूनच त्यांना अमेरिकेमध्ये जाण्यासही मनाई करण्यात आली होती.