सैफ अली खान वरील हल्ल्यानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री करिना कपूर खान ने अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे. सोशल मीडीयात तिने पोस्ट शेअर करत 'झालेल्या प्रकारानंतर अजूनही नक्की काय झालं हे स्वीकारायला वेळ लागत आहे. या कठीण आणि धक्कादायक प्रकारानंतर यामधून कुटुंबाला सावरायला थोडा वेळ द्या. पॅपराझी किंवा मीडीया ने कोणत्याही उलट सुलट चर्चा करू नये, अफवा पसवू नये असं आवाहन देखील तिने केलं आहे. दरम्यान लीलावती हॉस्पिटल मध्ये आयसीयू मध्ये सैफ दाखल असून त्याची स्थिती स्थिर आहे. Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानच्या चाहतीचं लीलावती हॉस्पिटल बाहेर खास पोस्टर; सिने निर्मात्यांना केलं अधिक रोमॅन्टिक सिनेमे करण्याचं आवाहन ( Watch Video). 

करीना कपूर खान चं स्टेटमेंट  

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)