Encounter In South Bastar: छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एका महत्त्वपूर्ण कारवाईत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. या प्रदेशातील घनदाट जंगली भागात नक्षलवाद्याविरोधात कारवाई करण्यात आली. सकाळी 9 वाजता सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने या भागात नक्षलविरोधी कारवाई सुरू केली. या कारवाईत तीन जिल्ह्यांमधील जिल्हा राखीव रक्षक (DRG), CRPF च्या एलिट जंगल युद्ध युनिटच्या पाच बटालियन, कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट अॅक्शन) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) 229 व्या बटालियनचा समावेश होता. या महिन्यात विजापूरमध्ये झालेली ही दुसरी मोठी चकमक आहे.
छत्तीसगडमधील दक्षिण बस्तरमध्ये चकमकीत 12 नक्षलवादी ठार -
12 Naxalites killed in encounter with security forces in Chhattisgarh's Bijapur district: Police. pic.twitter.com/6pRjcBJcqW
— Press Trust of India (@PTI_News) January 16, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)