Amit Shah and Jay Shah Viral Video: केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उत्तरायण उत्सवादरम्यान बुधवारी आपल्या कुटुंबासह गुजरातमधील अहमदाबाद येथील जगन्नाथ मंदिरात दर्शन घेतले. शाह आणि त्यांचा मुलगा आणि आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह यांच्यातील हलकाफुलका क्षण दाखवणारा या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अमित शहा मंदिराच्या आरती समारंभादरम्यान विधी करताना दिसत आहेत आणि जय शहा त्यांच्या शेजारी उभे राहून आपल्या मुलाला हातात घेऊन उभे आहेत. अमित शाह यांनी पूजा झाल्यानंतर सर्वांसमोर निरंजन पुढं करत आरती देत होते. त्यावेळी आरतीच्या प्रकाशापासून जय शाह यांनी त्यांच्या लहान बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला. जय शाह यांची ती कृती अमित शाह यांना आवडली नाही. त्यांनी तातडीनं जय शाहांना सुनावलं. 'कस्सू नाय ठाय, तारे काई नवो नको छोकरो चे' असं त्यांनी गुजरातीमध्ये जय शाह यांना सुनावलं. याचा मराठीमध्ये साधारण अर्थ हा 'काही होणार नाही, तुझा मुलगा स्पेशल आहे का?' असा होतो. अमित शाह आणि जय शाह यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर कशी प्रतिक्रिया
एका युजरने कमेंट केली की, "हाहाहा, माझं भारतीय आई-वडिलांवर प्रेम आहे. युजरने कमेंट केली की'बाप किसी का भी हो बाप बाप होता है', असे दुसऱ्याने म्हटले आहे. "टिपिकल इंडियन फादर... 'झॅपनेमैं दुसरा नाही लेगेट', असं एका तिसऱ्या युजरनं म्हटलं आहे. आणखी एकाने कमेंट केली की, 'हर घर की यही कहानी, बाप के सामना बेटे की कोई इज्जत नही चाहे बेटा कितना भी बड़ा आदमी क्यूं ना बन जाए[ही प्रत्येक घराची गोष्ट आहे;. आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनल्यानंतर जय शाह यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेत सन्मानित करण्यात आले होते. यापूर्वी ऑक्टोबर २०१९ पासून ते बीसीसीआयसचिव आणि २०२१ पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या फेरबदलानंतर आसामचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू देवजीत सैकिया यांची बीसीसीआयच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नेमकं काय झालं? पाहा व्हिडिओ
Arre Amit Shah ji, kuch to hesitate karo.. Jay Shah ICC president hai 😭 pic.twitter.com/C6jcgryDvO
— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) January 15, 2025
कोण आहेत जय शाह, जाणुन घ्या,सपुर्ण माहिती
जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा आहे. 36 वर्षांचे जय शाह यांनी 1 डिसेंबर 2024 रोजी आयसीसी संचालकपदाचा कार्यभार स्विकारला आहे. ते सर्वात तरुण आयसीसी संचालक आहेत. आसीसी संचालक होण्यापूर्वी ते बीसीसीआयचे सचिव होते. आयसीसी संचालक झालेले ते पाचवे भारतीय आहेत. यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या चार भारतीयांनी आयसीसीचं नेतृत्त्व केलं आहे. जय शाह यांचं 2015 साली रिशिता पटेल यांच्याशी विवाह झाला. जय शाह यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा सर्वात लहान असून त्याचा जन्म नोव्हेंबर 2024 मध्ये झाला आहे.