Ilu Ilu 1998 Official Trailer Out: पहिल्या प्रेमाची आठवणी प्रत्येकासाठी खास असते. 90 च्या दशकातील प्रेमकहाणी सांगणाऱ्या 'इलू इलू' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘इलू इलू’ (Ilu Ilu) या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच कलाकारांच्या उपस्थित संपन्न झाला. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनाही त्याच्या पहिल्या प्रेमाची आठवण नक्की येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजिंक्य बापू फाळके यांनी केलं आहे. या चित्रपटात एली आवराम हिने पहिल्यादा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. तिच्या मराठमोळ्या लूकने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

या चित्रपटात एली सोबत मीरा जगन्नाथ, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात,अंकिता लांडे, निशांत भावसार, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचा आहे.

'इलू इलू' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)