मनसे (Maharashtra Navnirman Sena) पक्ष आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कायमचं मराठीच्या मुद्दयावरुन आग्रही असतात. पण आता क्रिकेटच्या (Cricket) प्रक्षेपणावरुन मनसेने पुन्हा एकदा स्टार स्पोर्टस (Star Sports) या वाहिनीचे कान टोचले आहेत. कारण स्टार स्पोर्ट ही वाहिनी भारतातील सात भाषांमध्ये प्रक्षेपण करते मात्र यांत मराठीचा समावेश नाही. स्टार स्पोर्टस बांग्ला (Bangla), मल्यालम (Malyalam), तेलगू (Telgu),तमिळ (Tamil), कन्नाडा (Kannada), हिंदी (Hindi), इंग्रजीतून (English) प्रक्षेपण करते. तरी मराठीसाठी आग्रही असलेला मनसेने आता स्टार स्पोर्टस या वाहिनीचे मराठीतूनही प्रक्षेपण व्हावे यासाठी स्टार स्पोर्टस या वाहिनीला अल्टीमेटम दिले आहे. 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेला सुरुवात होत आहे. पण यंदाही स्टार स्पोर्ट्सवर मराठीतून (Marathi) प्रक्षेपण होणार नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे.
मनसेच्या दूरसंचार सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर (Satish Narkar) यांच्या नेतृत्त्वाखाली स्टार स्पोर्ट्स्च्या (star Sports) लोअर परेल (Lower Parel) येथील कार्यालयात मोर्चाचं आयोजन केलं गेल आणि स्टार स्पोर्ट्सला अल्टीमेटम देण्यात आला आहे. तरी आता इतर भाषांप्रमाणे टी20 विश्वचषक क्रिकेट सामन्याचं मराठीतूनही प्रक्षेपण होईल अशी शक्यता नाकारता येणार नाही. (हे ही वाचा:- Women's Asia Cup 2022 Final: अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव, भारताने विक्रमी 7व्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले)
महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचा मोठा विजय!!!!
स्टार स्पोर्ट्स चॅनेलचे प्रशासकीय अधिकारी उद्या दुपारी १२.३० वा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी येणार. @mnsadhikrut@abpmajhatv@TV9Marathi@ibnlokmattv1 @zee24taasnews @saammarathi https://t.co/p49wsohn6X
— Satish R Narkar (@SatishRNarkar1) October 13, 2022
मनसेने यापुर्वीही मराठी किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन बरीचं आंदोलन केली आहेत. तशीच ती आंदोलन यशस्वी देखील झाली आहे. तरी मनसेच्या या आंदोलनानंतर टी २० विश्वचषक स्पर्धेचं प्रक्षेपण मराठीत बघायला मिळणार का ह्याची उत्सुकता मराठी प्रेक्षकांना लागली आहे. तरी मनसेच्या या अल्टीमेटम नंतर स्टार स्पोर्टसचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खुद्द राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल होत राज ठाकरेंची भेट घेतली आहे.