Video: अ‍ॅडम झांपा ने पाचव्यांदा केले विराट कोहली याला आऊट, मिशेल स्टार्क-एश्टन एगर यांनी मिळून पकडलेला कॅच पाहून तुम्हीही म्हणाल 'वाह-वाह'
एश्टन एगर, मिशेल स्टार्क (Photo Credits: Twitter)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध राजकोटमध्ये सुरु असलेल्या दुसर्‍या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा 76 चेंडूत 78 धावांचा डाव संपवण्यासाठी मिशेल स्टार्क (Mitchell Starc) -एश्टन एगर (Ashton Agar) यांनी मिळून अ‍ॅडम झांपा (Adam Zampa) याच्या चेंडूवर बाउंड्री-लाईनजवळ अफलातून कॅच पकडला. भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) मधील दुसऱ्या सामन्यात झांपा पुन्हा एकदा विराटच्या वरचढ राहिला आणि त्याने भारतीय कर्णधाराला मालिकेत दुसऱ्यांदा तर आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये 5 व्यांदा आऊट करण्याचा पराक्रम केला. 27 वर्षीय ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजाने विराटला भारतीय डावा दरम्यान 44 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्टार्ककडे झेलबाद केले. जेव्हा विराट वनडेत 44 वे शतक करू पाहत होता, तेव्हा झांपाने त्याला स्टार्क आणिएगरच्या हाती अप्रतिमपणे कॅच आऊट केले. स्टार्क आणि एगरने पकडलेला हा कॅच इतका सुंदर होता की तुम्हीही त्याची प्रशंसा केल्या शिवाय राहणार नाही. (IND vs AUS 2nd ODI: शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल यांचे अर्धशतक; टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियाला 341 धावांचे आव्हान)

झांपाच्या या ओव्हरमधील चंदनुवर विराटने षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण लॉन्गऑनवर एगर आणि स्टार्कने चांगला सुसंवादपणा दाखवला आणि बाउंड्री लाईनवर सुंदर कॅच पकडला. एगरने पहिले विराटचा झेल पकडला, पण त्याचा तोल जात असल्याचे समजल्यास त्याने बाजूला उभ्या असलेल्या स्टार्ककडे चेंडू दिला आणि विराटला पॅव्हियनकडे पाठविले. दरम्यान, वनडेमध्ये झांपाने विराटला आऊट करण्याचीही पाचवी वेळ आहे. वनडेमध्ये कोहली आणि झांपा 12 वेळा आमने-सामने आले असून झांपा कोहलीला 5 वेळा बाद करण्यात यशस्वी ठरला. वनडे सामन्यांमध्ये कोहलीला सर्वाधिक रवि रामपॉल (Ravi Rampaul) याने बाद केले आहे. रामपालने सर्वाधिक सहा वेळा कोहलीला बाद केले. श्रीलंकाचा थिसारा परेरा, टिम साऊथी यांनीही वनडे सार्वधिक 5-5 वेळे कोहलीला बाद केले आहे.

दरम्यान, राजकोटमध्ये सुरु असलेल्या सामन्यात भारताने पहिले बॅटिंग करत 340 धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगचे आमंत्रण दिले होते. शिखर धवन, विराट आणि केएल राहुल यांनी भारताकडून अर्धशतकी कामगिरी केली. झांपाने आज सर्वाधिक 3 गडी बाद केले.