MI vs SRH, IPL 2020: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग XI
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आज आयपीएलच्या (IPL) 16 व्या सामन्यात शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने येतील. आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झाली तर हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल झाले आहेत. मागील सामन्यात दुखापत झालेल्या भुवनेश्वर कुमारच्या जागी संदीप शर्माला (Sandee Sharma) आणि खालील अहमदच्या जागी सिद्धार्थ कौलला (Siddharth Kaul) संधी मिळाली आहे.  मुंबईकडून कर्णधार रोहित, ईशान किशन, कीरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या चांगल्या लयीत आहे. मुंबईचा कर्णधार रोहितने चार सामन्यात 170 धावा केल्या असून तो शानदार लयीत चालला आहे. सीएसकेवर 7 धावांनी विजय मिळवल्यानंतर सनरायझर्सही मजबूत आहेत. या सामन्यात त्याच्या युवा खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले. (MI vs SRH, IPL 2020 Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

रोहितच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला आजवर युएई येथील आयपीएलमध्ये चांगले यश मिळाले असून संघाने चार पैकी दोन सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या-4 मध्ये स्थान मिळवले आहे. मागील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध संघाने एकतर्फी विजय नोंदविला होता. या सामन्यात संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करीत चार ओव्हरमध्ये केवळ 18 धावा देऊन दोन गडी बाद केले. दोन्ही संघांनी आपले शेवटचे सामने जिंकले असून आपला विजयरथ सुरु ठेवण्याचा प्रयत्न करतील. चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केल्याने हैदराबादचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल, तर मुंबईनेही आरसीबीविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये झालेला पराभव विसरुन पंजाबवर शानदार विजय मिळवत दमदार पुनरागमन केले.

मुंबई इंडियन्स प्लेइंग XI: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, कीरोन पोलार्ड, जेम्स पॅटिन्सन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

सनराइजर्स हैदराबाद प्लेइंग XI: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, केन विल्यमसन, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, राशिद खान, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल आणि टी नटराजन.