MI vs RCB IPL 2021: गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघातील सलामीच्या सामन्याने इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या मोसमाचा थरार सुरु होणार आहे. चेन्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात बेंगलोर कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सलामीच्या सामन्यात दोन्ही संघ आपल्या पराभवाची मालिका मोडण्याच्या प्रयत्नात असतील. आरसीबी (RCB) संघाने यापूर्वी झालेले आपले मागील पाचही सामने गमावले आहेत तर मुंबई 2013 पासून आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवू शकली नाही. शिवाय, मुंबई आणि बेंगलोर आजच्या ‘ब्लॉकबस्टर’ सामन्यात विजयाने हंगामाची सुरुवात करू इच्छित असतील आणि याच हेतूने दोन्ही संघाने एकमेकांना टक्कर देण्यासाठी मजबूत इलेव्हनची निवड केलेली आहे. दोन्ही संघासाठी नवीन सलामी जोडी मैदानात उतरणार असेल. (MI vs RCB IPL 2021: सलामीच्या सामन्यात बदलणार गेतविजेत्या मुंबई इंडियन्सचं नशीब? पहा IPL पहिल्या मॅचमधील ‘पलटन’ची चकित करणारी आकडेवारी)
दक्षिण आफ्रिकी क्विंटन डी कॉक पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने त्याच्या जागी क्रिस लिन कर्णधार रोहित शर्मासह सलामीला उतरेल. मुंबईकडून लिन आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को जानसेन डेब्यू करत आहे. सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड आणि कृणाल पांड्या यांच्यावर मधल्या फळीत धावगती वाढवण्याची जबाबदारी असेल. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्टसह नॅथन कोल्टर-नाईल/जेम्स नीशम संघात तिसरा वेगवान गोलंदाज असेल. राहुल चाहर/पियुष चावला संघात एकमेव पूर्णवेळ फिरकी गोलंदाज असेल. दुसरीकडे, आरसीबीसाठी कर्णधार विराट कोहलीसोबत देवदत्त पडिक्क्ल सलामीला उतरेल. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेल, काईल जेमीसन आणि रजत पाटीदार यांना डेब्यूची संधी मिळाली आहे. संघासाठी विराटसह पदार्पणवीर रजत पाटीदार सलामीला येईल. युजवेंद्र चहल संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज असेल. लक्षात घेण्यासारखे म्हणजे चेपॉक स्टेडियमवर मुंबईने 2012 पासून एकही सामना गमावलेला नाही.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), क्रिस लिन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, मार्को जानसेन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रजत पाटीदार, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल ख्रिश्चन, वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, शाहबाझ नदीम, काईल जेमीसन, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.