MI vs RCB IPL 2021: Harshal Patel याच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबई फलंदाजांची शरणागती, विजयासाठी बेंगलोरला 160 धावांचे लक्ष्य
हर्षल पटेल (Photo Credit: Twitter/IPL)

MI vs RCB IPL 2021: विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (Royal Challengers Bangalore) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 159 धावांपर्यंत मजल मारली आणि आरसीबीला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजीला आलेल्या मुंबईसाठी पदार्पणवीर क्रिस लिनचे (Chris Lynn) अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. लिनने 49 धावा केल्या तर कृणाल पांड्याने नाबाद आणि कीरोन पोलार्डने नाबाद धावांचे योगदान दिले. सूर्यकुमार यादवने 31 धावा, ईशान किशनने 28 धावा आणि कर्णधार रोहित शर्माने 19 धावा केल्या. हार्दिक पांड्या 13 धावांच करू शकला. दुसरीकडे, बेंगलोरसाठी गोलंदाजांनी शानदार बॉलिंगचे प्रदर्शन केले आणि मुंबईला मोठी धावसंख्या करू दिली नाही. हर्षल पटेलने (Harshal Patel) 5 गडी बाद केले तर काईल जेमीसन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाल्या. (MI vs RCB IPL 2021: दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज Marco Jansen चे आयपीएल डेब्यू, जाणून घ्या 6 फूट 8 इंच गोलंदाजाची कामगिरी)

आयपीएल 14च्या सलामीच्या सामन्यात पहिले फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या ओव्हरमध्ये संघाला कर्णधार रोहितच्या रूपात मोठा धक्का बसला.स्ट्राईकवर असलेल्या लिन सोबत धाव घेण्याच्या गोंधळात मुंबई कर्णधार रनआऊट झाला. रोहितने 19 धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने चौकार खेचत 14व्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सने पावर प्लेमध्ये 1 विकेट गमावून 41 धावा केल्या. लिन आणि सूर्यकुमारने जोरदार फटकेबाजी करतदुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दोघे संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेतील असे दिसत असताना जेमीसनने यादवला आऊट केलं. शानदार फलंदाजी करणाऱ्या लिनच्या रूपात संघाला मोठा धक्का बसला. लिन 49 धावांवर कॅच आऊट झाला. हर्षल पटेलने हार्दिकला 13 धावांवर एलबीडबल्यू आऊट मुंबईला चौथा धक्का दिला.

दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ एकूण 27 वेळा आमने-सामने भिडले आहेत. 17 सामन्यात मुंबईने बाजी मारली आहे तर 9 सामन्यात बेंगलोरने विजय मिळवला आहे. तसेच 1 सामना बरोबरीत सुटला होता.