मार्को जानसेन (Photo Credit: Twitter)

MI vs RCB IPL 2021: चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाविरुद्ध आयपीएल (IPL) 2021 सलामीच्या सामन्यात क्रिस लिन आणि मार्को जानसेन (Marco Jansen) यांना मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली आहे. लिनने आयपीएलचे एकूण 41 सामन्यतः जावपास 140 च्या स्ट्राईक रेटने 1280 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सने मागील वर्षी लिनला आपल्या ताफ्यात सामील केले होते मात्र त्याला इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) पाकिस्तानविरुद्ध मालिकेतून आलेला क्विंटन डी कॉक क्वारंटाइन असल्यामुळे लिनला संधी मिळाली आहे. मुंबईने यंदाच्या लिलावात खरेदी केलेला 20 वर्षीय जानसेन डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपला पहिला सामना खेळणाऱ्या जानसेनबद्दल आज आपण काही माहित नसलेल्या गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत. (MI vs RCB IPL 2021: टॉस जिंकून विराट कोहलीने घेतला गोलंदाजीचा निर्णय, सलामीच्या सामन्यासाठी पहा दोन्ही संघाचा Playing XI)

मार्को जानसेन हा दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज असून क्लर्क्सडोर्प येथील त्याचा जन्म झाला आहे. 20 वर्षीय मार्कोबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे  की तो आणि त्याचा जुळा भाऊ डूआन दोघेही क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज आहेत. नॉर्थ वेस्ट प्रोवियन्ससाठी दोघे भाऊ खेळतात. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लिलावात बोली लागवण्यात आलेला मार्को 140 किमी प्रति तासपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करू शकतो. मार्को सरासरी 137-138 किमी वेगाने गोलंदाजी करतो तसेच त्याचा सर्वाधिक वेग 141.2, 141.3 किमी एवढा आहे. शिवाय, आठव्या-नवव्या क्रमांकावर फलंदाजी करत मोठे फटके खेळण्यासाठी देखील तो सक्षम आहे. यापूर्वी प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी 6 फूट 8 इंच उंची असलेल्या मार्कोच्या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना आपण त्याच्यावर लक्ष ठेवून असल्याचं उघड केलं होतं. मुंबईने मार्कोला त्याच्या 20 लाख रुपयांचं बेस प्राईसवर खरेदी केले.

दक्षिण आफ्रिकेतील नॉर्थ वेस्ट अंडर-13 संघासाठी खेळत असताना त्याने घरगुती क्रिकेटमध्ये एक ठसा उमटवला आहे. त्याने आजवर 14 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 440 धावा आणि 54 विकेट घेतल्या आहेत. मार्कोने आतापर्यंत 3 अर्धशतके ठोकली आहेत तर एका डावात त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी 53 धावा देऊन 5 विकेट आणि पाच दिवसीय सामन्यात 8 विकेट त्याच्या नावावर आहेत. लिस्ट-ए (घरगुती वनडे) क्रिकेटमध्ये त्याने 13 सामन्यांत 16 विकेट आणि 112 धावा केल्या आहेत. शिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये 10 सामन्यात मार्को जानसेनने 6 विकेट्स घेत 71 धावा केल्या आहेत.