IPL 2019 Final: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या रोमांचक अंतिम सामन्यात 1 धावांनी विजय मिळवत मुंबई संघाने आयपीएल 12 च्या चषकावर नाव कोरले
MI vs CSK, IPL 2019 Final (Photo Credits: File Photo)

MI vs CSK, IPL 2019 Final: इंडियन प्रिमियर लीगच्या (Indian Premier League) 12 व्या सीझनच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) अशी लढत हैद्राबादच्या (Hyderabad) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Stadium) रंगली होती. या चुरशीच्या लढतीत मुंबई संघाने हैद्राबाद संघावर 1 धावाने विजय मिळवत आयपीएल 2019 च्या चषकावर आपले नाव कोरले. मुंबई इंडियन्स या संघाने चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकवण्याचा विक्रम केला आहे. CSK vs MI,IPL 2019 Final: जसप्रीत बुमराह ठरला 'मॅन ऑफ द मॅच'; तर पोलार्ड Perfect Catch of the Season चा मानकरी

या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई संघाने 20 ओव्हर्समध्ये 8 गडी गमावत 149 धावा केल्या. मुंबईकडून पोलार्डने सर्वाधिक 41 तर क्विंटन डी कॉक याने 29 धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजीमध्ये दीपक चहरचा मोठा वाटा ठरला. दीपक चहरने 3 तर शार्दुल ठाकूर आणि इम्रान ताहीर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. (आजच्या आयपीएल सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला मिळणार 20 कोटी रुपयांचे बक्षिस तर उपविजेत्या संघाला मिळणार 12.5 कोटी)

IPL ट्विट:

150 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची सुरुवात दमदार झाली. डु प्लेसिस आणि शेन वाटसन यांच्या खेळीने चेन्नई संघाची सुरुवात चांगली झाली. परंतु, त्यानंतर एकामागून एक विकेट्स गेल्यामुळे हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळला गेला. चेन्नईसाठी शेन वाटसनने सर्वाधिक 80 धावा केल्या. तर मुंबईसाठी जयप्रीत बुमराह याने 2, क्रुणाल पांड्या, लसित मलिंगा आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नई संघाला विजयासाठी 9 धावांची गरज होती. परंतु, मलिंगाच्या अचूक गोलंदाजीमुळे या चुरशीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने एका धावाने विजय मिळवला.

यापूर्वी मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी 3-3 वेळा आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर आता मुंबई संघाने अंतिम सामना जिंकत सर्वाधिक (चार वेळा) आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे करण्याचा विक्रम केला आहे.