IPL 2019 Final: आजच्या आयपीएल सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला मिळणार 20 कोटी रुपयांचे बक्षिस तर उपविजेत्या संघाला मिळणार 12.5 कोटी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit-Facebook)

आयपीएलच्या (IPL) 12 व्या सीझनमधील आज शेवटचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघामध्ये खेळवला जाणार आहे.राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम (Rajiv Gandhi International Cricket Stadium), हैदराबाद येथे आजचा सामना सायंकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येणार आहे. तर आजची फायनल मॅच कोण जिंकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

49 दिवस 59 सामने खेळवल्यानंतर आज आयपीएलचा फायनल सामना खेळवला जाणार आहे. तर आजच्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. त्याचसोबत उपविजेत्या संघाला 12.5 कोटी रुपये देण्यात येणार आहे.(Harrier Fan Catch Award: रिषभ पंत याचा कॅच पकडल्याने IPL पाहात स्टेडीयममध्ये बसलेला तरुण झाला लखपती)

आयपीएलमधील बक्षिसांची रक्कम

-विजयी टीम: 20 कोटी

-उपविजेता टीम: 12.5 कोटी

-तिसऱ्या क्रमांकावरील टीम: 10.5 कोटी (दिल्ली कॅपिटल्स टीम)

-चौथ्या क्रमांकावरील टीम: 8.5 कोटी (सनराइजर्स हैदराबाद टीम)

-ऑरेंज कॅप विजेता प्लेअर: 10 लाख

-पर्पल कॅप विजेता प्लेअर: 10 लाख

-मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर: 10 लाख

- एमर्जिंग प्लेअर: 10 लाख

वैयक्तिक पुरस्कार सुद्धा दिले जाणार आहे. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट बॉलर, सर्वोत्तम बॅट्समन, मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर, एमर्जिंग प्लेअरचा समावेश असणार आहे. बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनला मिळणाऱ्या पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप विजेत्यांना प्रत्येकाला लाखोंचे बक्षिस दिले जाणार आहे.