Harrier Fan Catch Award: रिषभ पंत याचा कॅच पकडल्याने IPL पाहात स्टेडीयममध्ये बसलेला तरुण झाला लखपती
IPL-2019

IPL 2019 Harrier Fan Catch Award: प्रत्यक्ष स्टेडीयममध्ये बसून आयपीएलचा थरार अनुभवण्याची मजा काही औरच. पण, ही मजा केवळ आनंत आणि समाधानच मिळवून देते असे नव्हे बरं. तर, ही संधी कधी कधी काही मंडळींना थेट लखपतीही बनवून जाते. उदाहरणच घ्यायचं तर सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपीटल्स या सामन्याचे घ्या ना. हा समाना स्टेडीयममध्ये बसून पाहणाऱ्या एका तरुणाला एका रात्रीत लखपती बनण्याची संधी मिळाली. कारण तो हॅरियर फॅन कॅच अवार्ड (Harrier Fan Catch Award) विजेता ठरला. त्याचे झाले असे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली हा आयपीएल सामना पाहण्यासाठी हजार दोन हजार रुपयांचे तिकीट खरेदी करुन हा तरुण स्स्टेडीयममध्ये पोहोचला. सामना सुरु झाला. मैदानावर दिल्ली कॅपीटल संघ फलंदाजी करत होता. हैदराबादचा संघ गोलंदाजीची जबाबदारी पार पाडत होता. रिषभ पंत स्ट्राईकवर होता. हैदराबाद संघाकडन गोलंदाज भुवनेश्वर याने चेंडू टाकला. काही क्षणातच रिषभ पंतने तो असा टोलावला की, तो स्टेडीयममध्येच जाऊन पोहोचला. हा थेट षटकार होता. रिषभने फटकावलेल्या या चेंडूचा झेल स्टेडीयममध्ये प्रेक्षक म्हणून पोहोचलेल्या या तरुणाने एका हाताने टीपला. इथेच तर या तरुणाच्या लखपती होण्याचे रहस्य आहे.

प्राप्त महिती अशी की, स्टेडीयममध्ये उपस्थित असलेला जो प्रेक्षक अशा प्रकार झेल टीपतो त्याला स्पॉन्सरकडून बक्षीस मिळते. या वेळी या बक्षीसाचे नाव आहे. हॅरियर फॅन कॅच अवार्ड. हाच अवॉर्ड या तरुणाला मिळाला. एक लाख रुपये असे या अवॉर्डचे स्वरुप असते. या तरुणाच्या सुरक्षेसाठी त्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही. मात्र, या तरुणाने हा झेल कसा टीपला याचा व्हिडिओ आपन इथे पाहू शकता. (हेही वाचा, IPL 2019: 'मी फक्त लय पाहतो आणि...' रिषभ पंत याने सांगितले सिक्सर मारण्याचे राज)

अवॉर्ड स्वीकारताना विजेता तरुण

IPL 2019 साठी Eliminator सामना बुधवारी सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपीटल यांच्यात झाला. या सामन्याच्या दुसऱ्ऱ्या इनिंगमध्ये दिल्लीचा खेळाडू रिषभ पंत याने हैदराबादचा प्लेअर भुवनेश्वर याच्या चेंडूवर 19 व्या ओव्हरमध्ये षटकार ठोकला. पंतने ठोकलेल्या या षटकाराची लांबी सुमारे 90 मीटर इतकी होती. हा षटकार मिड ऑफ साईड स्कीरन जवळ बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. या षटकाराचा झेल या तरुणाने टीपला. ज्याला एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.