CSK vs MI,IPL 2019 Final: जसप्रीत बुमराह ठरला 'मॅन ऑफ द मॅच'; तर पोलार्ड Perfect Catch of the Season चा मानकरी
IPL 2019 ( Getty Images and File Photo)

CSK vs MI IPL 2019: इंडियन प्रिमियर लीगच्या 12 व्या सीझनचा अंतिम सामना आज (12 मे)  मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगला. मुंबई इंडियन्स  संंघाने विजय मिळवत आयपीएल 2019 चं विजेतेपद पटकावलं आहे. या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) 'मॅन ऑफ द मॅच' (Man Of The Match) ठरला आहे. IPL 2019 Final: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या रोमांचक अंतिम सामन्यात 1 धावांनी विजय मिळवत मुंबई संघाने आयपीएल 2019 च्या चषकावर नाव कोरले

जसप्रीत बुमराह 'मॅन ऑफ द मॅच'

सन रायजर्स हैद्राबाद संघ (Sunrisers Hyderabad) Fairplay Award ने गौरवण्यात आला. तर हार्दिक पांड्या Fastest Fifty Award, पोलार्ड Perfect Catch of the Season आणि Andre Russell The season's Super Striker म्हणून गौरवण्यात आला आहे.  Orange Cap चा मानकरी हैदराबादचा डेविड वॉर्नर ठरला आहे तर पर्पल कॅपचा मानकरी इम्रान ताहीर ठरला आहे. IPL 2019 Final: मुंबई इंडियंस संघाच्या रोमांचक विजयावर सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर आजचा सामना पार पडला. आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ चौथ्यांदा अंतिम सामन्यासाठी एकमेकांविरुद्ध लढले.