IPL 2019 Celebration : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या कालच्या सामन्यात अंतिम बॉल पर्यंत रंगत कायम होती पण अखेरीस केवळ एका रनाच्या फरकाने मुंबईने विजय मिळवत आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मग अशा या दमदार विजयानंतर त्याच सेलिब्रेशन देखील अजून दणक्यात व्हायला हवं ना? म्ह्णूनच आज, मुंबई इंडियन्सचा संघ मुंबईतीलअंबानींच्या (Ambani House) पेडर रोड (Pedder Road)वरील अँटीला (Antilla) बंगल्यापासून ते मरिन ड्राइव्ह (Marine Drive) वरील ट्रेडेन्ट हॉटेल (Trident Hotel) पर्यंत ओपन बस मधून आपल्या फॅन्सची भेट घेणार आहे. सोमवारी 13 मे ला संध्याकाळी 6:30 ला या सेलिब्रेशन सफरीची सुरवात होईल.
क्रिकेटचे चाहते हे अनेकदा खेळाडूंपेक्षा देखील अधिक उत्साही असतात त्यामुळे जिंकल्याचा आनंद त्यांच्या सोबत साजरा करणे महत्वाचे आहे असे मानून हे सर्व खेळाडू अँटीला ते ट्रेडेन्ट हॉटेल पर्यंत साधारण सहा किलोमीटर अंतर पार करतील. IPL 2019 Final: आयपीएल 12 च्या विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांचे हटके डान्स सेलिब्रेशन (Watch Video)
यापूर्वी देखील मुंबई इंडियन्स ने 2013, 2015, 2017 मध्ये आयपीएल चषक आपल्या नावे केलं होतं. मात्र यंदा हैद्राबादच्या (Hyderabad) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर अटीतटीच्या लढतीत केवळ 1 धावाने विजय मिळवल्याने चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई संघाने 20 ओव्हर्समध्ये 8 गडी गमावत 149 धावा केल्या. मुंबईकडून पोलार्डने सर्वाधिक 41 तर क्विंटन डी कॉक याने 29 धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजीमध्ये दीपक चहरचा मोठा वाटा ठरला.
यानंतर चेन्नईच्या संघाने देखील दमदार फलंदाजी करत ही चुरस टिकवून ठेवली होती, अगदी शेवटच्या बॉल पर्यंत कोण जिंकेल याचा अंदाज लागणे देखील शक्य नसताना श्रीलंकेचा खेळाडू लसिथ मलिंगा याने आपला अनुभव दाखवत ट्रॉफी टीम ला मिळवून दिली.