मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची  (Mumbai Cricket Association President Election) निवडणुकीत अंजिक्य नाईक (Ajinkya Naik)  यांचा विजय झालाय. अंजिक्य नाईक यांनी संजय नाईक (Sanjay Naik)  यांचा पराभव करत 107 मतांनी विजय मिळवलाय. अजिंक्य नाईक यांना 221 मते मिळाली आहेत.मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे. अजिंक्य नाईक वयाच्या 38 व्या वर्षी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले आहेत. अमोल काळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.  (हेही वाचा - खेळाडूंना षटकार मारण्यावर बंदी, सिक्स मारल्यास फलंदाज होणार बाद, इंग्लंडच्या क्रिकेट क्लबचा अजब निर्णय)

पाहा पोस्ट -

या निवडणुकीच्यानिमित्तानं आशिष शेलार संजय नाईक यांच्यासाठी ताकद लावताना पाहायला मिळाले. तर, अजिंक्य नाईक यांच्यासाठी शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी ताकद लावल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी शरद पवार आणि इतर पक्षातील राजकीय नेते यांचे आभार मानतो. क्रिकेटसाठी काम सुरु ठेवणार आहे. माझ्या सारख्या तरुणावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो,असं अजिंक्य नाईक म्हणाले.

10 जून रोजी अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे झालेल्या टी20 वर्ल्ड कप  स्पर्धेदरम्यान न्यूयॉर्कमध्ये अमोल काळे यांच्या अकाली निधनानंतर एमसीएचं अध्यक्ष पद रिक्त होतं. त्यानंतर या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.अजिंक्य नाईक २०१५ पासून MCA मध्ये काम करत आहेत. आधी मार्केटिंग कमिटीमध्ये नंतर अपेक्स कौन्सिल सदस्य, आता सचिव आणि आता ते अध्यक्ष होणार आहेत.