मार्कस स्टोइनिस, क्रिस गेल (Photo Credit: Twitter)

ऑस्ट्रेलियाच्या मधल्याफळीतील मार्कस स्टोइनिस याने (Marcus Stoinis) मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) कडून बिग बॅश लीगच्या (Big Bash League) इतिहासातील 79 चेंडूत 147 वैयक्तिक धावा केल्या. त्याच्या डावामुळे स्टार्सने सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) विरुद्ध 44 धावांनी विजय मिळविला. स्टोइनिसने डावात 13 चौकार आणि आठ षटकार मारले. स्टोइनिसने अशा प्रकारे दोन वर्षांपूर्वी डार्सी शॉर्टने (D'Arcy Short) केलेला विक्रम मोडला. शॉर्टने 69 चेंडूत नाबाद 122 धावा फटकावल्या होत्या. मेलबर्न येथे मेलबर्न स्टार आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात बिग बॅश लीगच्या सुरू असलेल्या नवव्या मोसमाच्या 35 व्या सामन्यादरम्यान, स्टोइनिसने पहिले टी-20 शतक करत संघाला 20 ओव्हरमध्ये 219/1 असा मोठा स्कोर करण्यास महत्वाची भूमिका बजावली. स्टार्सने दिलेल्या या मोठ्या आव्हानाच्या प्रत्युत्तरात सिक्सर्सची टीम सात विकेटवर 175 धावाच करू शकली. आजवरच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असलेल्या स्टोइनिसने आपली आघाडी वाढवत सर्वोच्च स्थान कायम राखले. बीबीएलमधील पहिले शतक केल्यावर स्टोनिसने क्रिस गेल याच्या सेलिब्रेशनचे अनुकरण केले. (BBL 2019-20: टॉम बंटन याने बिग बॅश लीगमध्ये सलग 5 षटकार ठोकत झळकावले दुसरे वेगवान अर्धशतक, पाहा Video)

16 व्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर स्टोइनिसने सिडनीचा फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओ’किफच्या चेंडूवर एक धवन शतक पूर्ण केले युनिव्हर्स बॉस गेलच्या उत्सवाचे अनुकरण केले. पाहा हा व्हिडिओ:

स्टोइनिसने हिल्टन कार्टराइटच्या साथीने द्विशतकी भागीदारी केली ज्यामुळे स्टार्सने 219 धावांचा डोगर सिक्सर्सपुढे उभारला. स्टोनिस आणि कार्टराइटची 207 धावांची सलामीची भागीदारी ही स्पर्धेतील आजवरची सर्वोच्च भागीदारी आहे. कार्टराईटने 59 धावांचे योगदान दिले. अखेरच्या ओव्हरमध्ये कार्टराइट सिडनीचा वेगवान गोलंदाज टॉम कुरन याच्या चेंडूवर बाद झाला, स्टोइनिसने 13 चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने नाबाद 147 धावा काढल्या. दुसरीकडे, इंडियन प्रीमियर लीग2020 च्या मोसमातील लिलाव होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या फ्रेंचायझीने त्याला रिलीज केले होते आणि त्यानंतर दिल्लीच्या कॅपिटल्सने लिलावात खरेदी केले. शिवाय, आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला ऑस्ट्रेलियन संघातही स्थान मिळाले नाही.