BBL 2019-20: टॉम बंटन याने बिग बॅश लीगमध्ये सलग 5 षटकार ठोकत झळकावले दुसरे वेगवान अर्धशतक, पाहा Video
टॉम बंटन (Photo Credit: Twitter/BBL)

यावर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) खरेदी केलेल्या टॉम बंटन (Tom Banton) याने सध्या सुरु असलेल्या बिग बॅश लीग (Big Bash League) मध्ये केवळ 16 चेंडूत अर्धशतक झळकावत आपला शानदार फॉर्म कायम ठेवला. रविवारी न्यूझीलंडच्या एका फलंदाजाने 6 चेंडूत 6 षटकार ठोकले आणि आज, सोमवारी इंग्लंडचा फलंदाज बंटनने ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या बीबीएल (BBL) मध्ये 5 चेंडूत सलग 5 षटकार ठोकले. इंग्लंड संघाकडून खेळणारा 21 वर्षीय सलामी फलंदाज बॅंटन कर्णधार क्रिस लिनबरोबर सिडनी थंडरविरूद्ध पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आला. 8-8 ओव्हर्सच्या या सामन्यात बंटनने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्यास सुरुवात केली. बॅटनने अर्जुन नायरला (Arjun Nair) एका षटकात सलग पाच षटकार ठोकले आणि ब्रिस्बेन हीटने 4 बाद 119 धावांचा स्कोर उभारला. (BBL 2019-20: आरोन फिंच याच्या मेलबर्न रेनेगेड्स संघाने सलग 6 सामने गमावल्यावर Netizens म्हणाले RCB च्या अभिशापाने दिली धडक)

ब्रिस्बेन हीटकडून खेळताना बंटनने डावाच्या चौथ्या षटकात दुसऱ्या ते सहाव्या चेंडूपर्यंत सलग षटकारांचा वर्षाव केला. नायरच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडू बंटनने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, पण तो मिस झाला. मात्र, यानंतर बंटनने त्याच्या सलग षटकात 5 षटकार ठोकले आणि अवघ्या 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. बीबीएलमधील हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. 2016 मध्ये क्रिस गेल याने मेलबर्न रेनेगेड्ससाठी खेळत 12 चेंडूत, सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले. पाहा बंटनने मारलेले हे पाच षटकार:

डिसेंबरमध्ये आयपीएलच्या लिलावात केकेआरने बंटनला त्याच्या 1 कोटींच्या बेस प्राइसवर खरेदी केली. दरम्यान, मेलबर्न स्टार्सविरुद्ध दुसऱ्या सामन्यात बंटनने 36 चेंडूत 64 धावा फटकावल्या पण हीटला पराभवातून वाचवण्यासाठी ते पुरेसे नव्हते. हीटला या मॅचमध्ये 22 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.