IND vs ZIM: झिम्बाब्वे वनडे मालिकेसाठी शिखर धवन नव्हे तर लोकेश राहुल कर्णधार, BCCI ची घोषणा
KL Rahul (Photo Credit - Twitter)

झिम्बाब्वे दौरा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियामध्ये (Team India) मोठा बदल झाला आहे. केएल राहुलला (KL Rahul) तंदुरुस्त घोषित करण्यात आले असून आता तो टीम इंडियाचे नेतृत्व करेल. या दौऱ्यासाठी यापूर्वी शिखर धवनला (Shikhar Dhawan) संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले होते, परंतु आता बीसीसीआयने (BCCI) केएल राहुलच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. भारताला 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे, जी हरारे येथे होणार आहे. केएल राहुल आयपीएल 2022 पासून एकही सामना खेळू शकलेला नाही. याआधी तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत कर्णधारपद भूषवणार होता, मात्र मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी त्याला अनफिट घोषित करण्यात आले आणि ऋषभ पंतला कर्णधारपद सोपवावे लागले.

त्यानंतर तो फिट नसल्याने इंग्लंड दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही. नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात केएल राहुलला कोरोना झाला होता. तेव्हापासून तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये घाम गाळत होता. फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर केएल राहुलला मॅच-फिट घोषित करण्यात आले आहे आणि आता तो झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व करेल. केएल राहुल आशिया कपमध्येही दिसणार असून त्याला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. (हे देखील वाचा: Most Run In Asia Cup: 'या' पाच फलंदाजांनी आशिया कपमध्ये केल्या सर्वाधिक धावा, यादीत 2 भारतीयांचाही समावेश)

आता झिम्बाब्वे मालिकेसाठी हा  असेल संघ:

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रशीद कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा - (ODI मालिका)

पहिली सामना - 18 ऑगस्ट (गुरुवार)

दुसरा सामना - 20 ऑगस्ट (शनिवार)

तिसरा सामना - 22 ऑगस्ट (सोमवार)