Most Run In Asia Cup: 'या' पाच फलंदाजांनी आशिया कपमध्ये केल्या सर्वाधिक धावा, यादीत 2 भारतीयांचाही समावेश
Five Batsmen Most Runs in Asia Cup (Photo Credit - Twitter)

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) यूएईमध्ये (UAE) 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. याचे यजमानपद श्रीलंका क्रिकेट बोर्डाला दिले आहे, ज्यामध्ये एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. यातील पाच संघांची घोषणा करण्यात आली आहे, तर एक संघ पात्रता फेरीतून स्पर्धेच्या अ गटात प्रवेश करेल. टीम इंडिया 28 तारखेला पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाने सर्वाधिक आशिया कपचे विजेतेपद जिंकले आहे. आशिया चषक 1984 मध्ये सुरू झाला आणि तेव्हापासून ही स्पर्धा जवळजवळ प्रत्येक दोन किंवा तीन वर्षांनी आयोजित केली जाते. शेवटच्या वेळी ही स्पर्धा 2018 मध्ये झाली होती. त्या हंगामातील विजेता संघ भारतीय संघ होता, ज्याने विक्रमी सातव्यांदा आशिया कप जिंकला. त्याचबरोबर आशिया चषकातही अनेक फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का आशिया कपच्या इतिहासात कोणत्या 5 फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशाच 5 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत.

1. सनथ जयसूर्या

आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. जयसूर्याने या स्पर्धेतील 25 सामन्यांच्या 24 डावात 1220 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 53 पेक्षा जास्त झाली आहे. यादरम्यान त्याने 6 शतके आणि 3 अर्धशतके केली आहेत.

2. कुमार संगकारा

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा अजून एक फलंदाज आहे तो म्हणजे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा. आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर कुमार संगकारा आहे. संगकाराने 24 सामन्यांत 48 च्या सरासरीने 1075 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 4 शतके आणि 8 अर्धशतके केली आहेत.

3. सचिन तेंडुलकर

जिथे सर्वाधिक धावा केल्या जातात त्या प्रत्येक यादीत सचिन तेंडुलकरचे नाव आहे. सचिनने आशिया कपमध्ये 21 डावात 971 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरीही 50च्या वर गेली आहे. सचिनने आशिया कपमध्ये 2 शतके आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत.

4. शोएब मलिक

या यादीत एका पाकिस्तानी फलंदाजाचेही नाव आहे. पाकिस्तानचा महान अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने 21 सामन्यांच्या 19 डावात 907 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 64.78 इतकी आहे. मलिकने आशिया कपमध्ये तीन शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. शोएबने पाकिस्तानसाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. (हे देखील वाचा: Asia Cup Winners List: आशिया कप विजेत्यांची यादी, जाणून घ्या कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा आशियाई विजेतेपद पटकावले)

5. रोहित शर्मा

या यादीत एक नाव टीम इंडियाचा घातक सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माचंही आहे. रोहितने या स्पर्धेतील 27 सामन्यात 883 धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितच्या बॅटमधून एक शतक आणि 7 अर्धशतकं झळकली आहेत. यंदाच्या यादीत रोहित आणखी वर येऊ शकतो.