'बाहेर पडा आणि मत द्या', असे म्हणत सचिन तेंडूलकर याचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन (watch Video)
Sachin Tendulkar (Photo Credits: Getty Images)

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Elections 2019) वातावरण आहे. नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहीत करण्याचे विविध जाहीराती, कॅम्पेन्स सादर केले जात आहेत. त्याचबरोबर अनेक खेळाडू, सिनेस्टार्स यांच्याकडूनही मतदान करण्याचे आवाहन केले जाते. राज्यात तीन टप्प्यातील मतदान पार पडले असून चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी होणार आहे. या दिवशी मायानगरी मुंबईत मतदान होणार असल्याने मास्टर बास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्याने ट्विटर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. (पाकिस्तान संघाचा 'हा' खेळाडू सचिन तेंडूलकर ह्याच्याकडून वर्ल्ड कपसाठी सल्ला घेणार)

या व्हिडिओत सचिन तेंडूलकर म्हणतो की, "आपण सर्वांनी 29 एप्रिल रोजी घराबाहेर पडून मतदान करायला हवे. 29 एप्रिलला फक्त मी आणि अंजलीच नाही तर यंदा सारा-अर्जुन देखील मतदान करणार आहेत. त्यामुळे बाहेर पडा आणि मतदान करा."

हा व्हिडिओ शेअर करताना सचिनने त्याला साजसे कॅप्शन दिले आहे. मतदानाचा अधिकार हे लोकशाहीचे गिफ्ट आहे. त्यामुळे बाहेर पडा आणि मत द्या, असे सचिनने लिहिले आहे.

सचिन तेंडूलकर याचे ट्विट:

 

देशात सात टप्प्यात मतदान होणार असून त्यातील अजून 4 टप्प्यातील मतदान बाकी आहे. तर महाराष्ट्रात 29 एप्रिल रोजी अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.