Lockdown: स्थलांतरित मजूरांच्या मदतीस भारतीय क्रिकेटपटू उतरला रस्त्यावर; मित्र, शेजारी आणि पोलिसांच्या मदतीने कामगारांना करतोय अन्न-पाण्याचे वाटप
तजिंदर सिंह ढिल्लों, स्थलांतरित मजूर, Migrant Workers, तजिंदर सिंह ढिल्लों (Photo Credit: Twitter/@lionsdenkxip)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) भारतातील गरीब कामगारांना सर्वाधिक फटका बसला आहे. काम आणि पैसे नसल्याने कामगार आपल्या घरी परतण्यासाठी हजारो मैल पायपीट करत आहेत. लॉकडाउनमुळे (Lockdown) कामगार आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ अली आहे. पायी किंवा मिळेल त्या वजनाने घरापर्यंतचा जीवघेणा प्रवास करत आहे. त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर या काळात व्हायरल झाले आहे. मजुरांची अशी दयनीय स्थिती पाहून एका क्रिकेटपटूचे मन खिन्न झाले आणि तो त्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला. आयपीएल (IPL) संघ किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) अष्टपैलू तजिंदर सिंह ढिल्लों (Tajinder Singh Dhillon) स्थलांतरित मजुरांना अन्न आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करत आहे. राजस्थानमधील 27 वर्षीय तजिंदरने आपल्या घराजवळ महामार्गावरून जात असलेल्या गरीब प्रवाश्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली. (Coronavirus: लॉकडाउन काळात रोजगार तुटलेल्या धावपटू प्राजक्ता गोडबोलेच्या मदतीला धावले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्वरित मदतीचे दिले आदेश)

"कानपूरकडे जाणारा मुख्य महामार्ग माझ्या घरापासून 100 मीटर अंतरावर आहे आणि बातमीवरील लोक त्या मार्गाचा वापर दिल्लीहून बाहेर पडणाऱ्या स्थलांतरित कामगारांद्वारे करीत असल्याचे सांगत होते," तजिंदरने किंग्स इलेव्हन संकेतस्थळाद्वारे म्हटले. “मी माझ्या कुटूंबातील सदस्यांना सांगितले की आपण सर्वांनी एकत्रितपणे या स्थलांतरित कामगारांना मदत केली पाहिजे, ज्यांच्यापैकी बरेच जण चप्पल न चालता चालले होते. त्यानंतर मी जवळपास राहणाऱ्या माझ्या मित्रांना बोलावले आणि परप्रांतीयांपर्यंत अन्न कसे वितरित करावे याची योजना आखली."

तजिंदरची इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

"Koi bhuka nai rahega na koi pyasa rahega na koi baccha dudh k liye royega" Ek choti c muheem hmm sb dosto ne milkar start ki hai un majdoor bhaiyo baheno k liye jo apne apne ghar vapis jaa rahe h is 40degree ki garmi me baccho ko sath lekar pedal jana really out of our mind. Lakin by the grace of god hmm tb tak in majdoor bhaiyo bheno ka sath dete rahenge jb tak unko jarurat rahegi aaj is muheem ka 4th day hai ye post mere un bhaiyo ko inspired karne k liye h jo itni garmi me corona k dar k wavjood poora din road par khade hokar kisi ko bhooka pyasa nai rahene de rahe "m really proud of u guys" keep it up waheguru maher karega te shanu himmat dega🙏🏻 My team : Sarvesh Bhatnagar sir Jitendra Singh Angy Inderjit singh toor Harpreet Singh Aman Dhillon Ashish Khatri Gurtej Singh Dhillon Guru Gurjeet Dhillon Gurjeet Arora Preetpal Singh Dhillon akashderp singh Raman Josan Honey Singh Abhijeet Dhillon Sunil Sharma Pt Shanky Sharma Manik Beri Praveen Chaudhary @shailendra singh tomar Nd many of my frnds who helps us financially as well as to give some food packets nd all. I thanks to Balkeshwar chowki police ,Khandoli expressway police also to give support to us🙏🏻🙏🏻 I thanks to all my team from the bottom of my heart keep going guys koi bhuka nai rahena chaiye koi pyasa nai rahena chaiye koi baccha dudh k bina nai jana chaiye Right now we give food water milk Biscuit packets to more than 4000 to 5000 people daily. Still we trying to raise our bars. Guys keep inspiring "Humanity is our first priority" Waheguru ji ka khalsa waheguru ji ki fateh 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

A post shared by Tajinder Singh Dhillon (@tj.dhillon19) on

तजिंदरला इतरांनीही मदत केली. ज्यांनी प्रवाशांसाठी भाजी आणि चपाती बनवण्यासाठी बटाटे आणि पीठ उपलब्ध करुन दिले. "आमच्या परिसरातील एका व्यक्तीचा भाजीपालाचा व्यवसाय आहे म्हणून मी त्याला भाजी आणि बटाटे द्यायला विनंती केली. कॉलोनीमधून आम्ही जवळपास 50 किलो पीठ गोळा केलं आणि 1400 चपात्यांचे वाटप केले. पहिल्या दिवशी 1000 आणि त्यानंतर आकडा 5000 पर्यंत पोहचला. त्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. पुरीभाजीसह आम्ही दूध आणि सरबतही वाटले," तजिंदर म्हणाला. पोलिसांनी जमावाला संघटित करण्यास मदत केली, तर ताजिंदर आणि त्याच्या मित्रांनी प्रवाशांना अन्न वाटून दिले. आरोग्य संकटामुळे 3000 लोकांचा मृत्यू झाला आहेत तर 1 लाख हुन अधिक लोकं संक्रमित झाले आहेत.