न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्याचा निकाल पुन्हा एकदा सुपर-ओव्हरने लागला. सलग दुसऱ्या सामन्यात सुपर ओव्हर खेळणाऱ्या न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये 13 धावा करत भारताला 14 धावांचे लक्ष्य दिले. केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी सुपर ओव्हर खेळली. राहुल 10 आणि कोहलीने 6 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.
IND vs NZ 4th T20I Highlights: सुपर ओव्हरमध्ये भारताचा सलग दुसरा विजय, भारताने 5 चेंडूत मिळविला विजय
न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात सुपर ओव्हर जिंकल्यानंतर मालिका जिंकणारा भारतीय संघ (Indian Team) पुन्हा चौथ्या सामन्यात वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड संघाचा सामना करेल. यापूर्वी मालिका जिंकलेली टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्ध 4-0 अशी मजल मारण्याच्या प्रयत्न करेल. मात्र, त्यांच्यासाठी हे सोप्पे नसणार. मागील सामन्यात किवी संघाने टीम इंडियाने दिलेल्या 179 धावांच्या प्रत्युत्तरात तितक्याच धाव करत सामना बरोबरीत केल्या होता, पण सुपर ओव्हरमध्ये ते पुन्हा एकदा अपयशी झाले आणि त्यांना मालिकेत तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. मालिका गमावल्यानंतर अखेरचे दोन सामने जिंकून यजमान लाज वाचवण्याचा प्रयत्न करेल. तथापि, या वेळी न्यूझीलंडवर दबाव अधिक असेल. घरातील प्रेक्षकांसमोर जिंकून लाज वाचवण्याचे आव्हान त्यांच्या समोर असेल.
भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने यापूर्वीच भारतीय संघ बदलसह चौथ्या टी-20 मध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. विरोधी संघावर दबाव असल्याने मालिका जिंकल्यानंतर प्लेयिंग इलेव्हनमध्ये भारत बदल करू शकतो. नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना शिल्लक दोन सामन्यासाठी संधी दिली जाऊ शकते. शिवाय, कुलदीप यादव, संजू सॅमसन (Sanju Samson) यांनाही खेळायला दिले जाऊ शकते. दुसरीकडे, किवी संघ फलंदाजीने चांगली सुरुवाट केल्यावर अडखळते. प्रत्येक सामन्यात हे पाहिले गेले आहे. केन विल्यमसन (Kane Williamson) हा त्याचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज आहे परंतु तो एकटा काहीच करू शकला नाही. किवी संघ मुख्य वेगवान गोलंदाजांशिवाय संघर्ष करताना दिसत आहे. टीम साऊथी संघात आहे परंतु त्यांची धार कुठेतरी हरवलेली दिसत आहे. यानंतर भारताला न्यूझीलंडमध्ये 3 सामन्यांची वनडे आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
असा आहे भारत न्यूझीलंड संघ
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड: मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विल्यमसन (कॅप्टन), टिम सेफर्ट (विकेटकीपर), रॉस टेलर, कॉलिन डी ग्रैंडहोम, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम साउथी, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, स्कॉट कुग्गेलैन, हमीश बेनेट.