भारत-वेस्ट इंडिज (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी तिरुअनंतपुरमच्या (Thiruvananthapuram) ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. शुक्रवारी हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने सहा विकेटने विंडीजवर विजय मिळवला होता. विंडीजने पहिले फलंदाजी करत ठेलेल्या 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने नाबाद 94 धावांची खेळी करत रेकॉर्ड धावांचा टप्पा गाठत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता आज होणाऱ्या मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात टीम इंडियाला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागाच्या उणीवा दूर करून मालिका मोठ्या विजयासह जिंकण्याच्या निर्धारित असेल. मागील 13 महिन्यात भारत-वेस्ट इंडिजमध्ये सहा टी-20 सामने खेळवले गेले आणि सर्व सामन्यात टीम इंडियाने विजयाची नोंद केली. आता कोहलीच्या टीमची नजर सलग 7 वा टी-20 सामना जिंकण्याकङे असेल. ('चाहत्यांनी मैदानात धोनी-धोनी ओरडू नये' विराट कोहली यांनी केलेल्या वक्तव्याचे नेमके कारण काय?)

भारत आणि वेस्ट इंडीज संघातील टी-20 मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केली जाईल. स्टार स्पोर्ट्स 1 वर इंग्रजी आणि स्टार स्पोर्ट्स 1 वर हिंदी भाषेत आपण या सामन्याचे आनंद लुटू शकतात. यासह, आपण होस्टारवर सामन्याचा लाईव्ह स्ट्रीमिंगदेखील पाहू शकता.

मागील सामन्यात भारतीय गोलंदाज अपेक्षा पूर्ण करु शकले नाहीत. एव्हिन लुईस, शिमरोन हेटमायर, आणि कर्णधार किरोन पोलार्ड यांनी भारतीय गोलंदाजांची क्लास घेतली. दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेशविरुद्ध प्रभावी ठरलेल्या दीपक चहर याने 56 धावा लुटवल्या आणि एकच विकेट घेतली. टी-20 संघात पुनरागमन केलेल्या भुवनेश्वर कुमार याला एकही विकेट मिळाली नाही आणि त्याने चार ओव्हरमध्ये 36 धावा दिल्या. वॉशिंग्टन सुंदर, रोहित शर्मा आणि कोहलीने विंडीजविरुद्ध महत्त्वपूर्ण कॅच सोडला, ज्यामुळे विजयी संघाला 200 पेक्षा अधिक धावा केल्या.

असे आहे भारत आणि विंडीज संघ:

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मनीष पांडे, केएल राहुल, संजू सॅमसन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव

वेस्ट इंडीज: किरोन पोलार्ड (कॅप्टन), निकोलस पूरन, फॅबियन एलन, शेल्डन कोटरेल, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, ब्रॅंडन किंग, एव्हिन लुईस, किमो पॉल, खेरी पियरे, दिनेश रामदिन (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, लेंडल सिमंस, केसरीक विल्यम्स, हेडन वाल्श जूनियर.