'चाहत्यांनी मैदानात धोनी-धोनी ओरडू नये' विराट कोहली यांनी केलेल्या वक्तव्याचे नेमके कारण काय?
विराट कोहली (Photo Credit: @BCCI/Twitter)

भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज रिषभ पंत (Rishbh Pant) गेल्या अनेक सामन्यात चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरला आहे. पंतला मागील अनेक सामन्यात मोठ्या धावा करण्यात अपयश आले आहे आणि यष्टीरक्षण करताना त्याच्याकडून झालेल्या चूकांमुळे त्याला जोरदार टीकांचा सामना करावा लागला आहे. अलीकडेच डीआरएसच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याला लक्ष्य केले गेले होते. यावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) रिषभ पंतचे समर्थन करताना दिसत आहे. रिषभ पंत युवा खेळाडू असून त्याच्यावर संघाचा विश्वास आहे. तसेच मैदानात चाहत्यांनी धोनी-धोनी ओरडू नये. हे आदरणीय नाही. कारण कोणत्याही खेळाडूला असे झालेले आवडणार नाही, असे कोहली म्हणाला.

महेंद्र सिंह धोनीला गेल्या अनेक दिवसांपासून संघातून वगळ्यात आले आहे. महेंद्र सिंह धोनीच्या जागेवर रिषभ पंत या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून रिषभ पंतला चांगली कामगिरी बजावता आली नाही. एवढेच नव्हेतर, महेंद्र सिंह धोनी मैदानात असताना, डीआरएसच्या चुका टाळता येत होत्या. परंतु, डीआरएसच्या चुकीच्या निर्णयामुळे रिषभ पंतला चाहत्यांनी धारेवर धरले आहे. तसेच रिषभ पंतच्या चुकीच्या निर्णयानंतर मैदानात धोनी-धोनी असा आवाज घुमायला सुरुवात होते. यावर विराट कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे. "चाहत्याने मैदानात धोनी धोनी असे ओरडू नये, हे आदणीय नाही. कारण कोणत्याही खेळाडूला असे झालेले आवडणार नाही. रिषभ पंत हा युवा खेळाडू आहे. तसेच रोहित शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे रिषभ हा सामना जिंकून देणारा खेळाडू आहे. महत्वाचे म्हणजे, त्याला इतके एकटे सोडूनही चालणार नाही की, तो मैदानात निराश होईल. आम्ही त्याच्या मदतीसाठी येथे आहोत", असेही कोहली यावेळी म्हणाला. हे देखील वाचा-IND vs WI 1st T20I: विराट कोहली याची नाबाद 94 धावांची खेळी, टी-20 मध्ये रोहित शर्मा याला पछाडत बनला No 1

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 6 विकेटने विजय मिळवला. विराट कोहली याने सर्वाधिक 94 धावा केल्या, तर सलामी फलंदाज केएल राहुल ने 62 धावांचे योगदान दिले.