कर्नाटक प्रीमियर लीग मधील बेळगाव पँथर्स च्या मालकाला सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक, 34 खेळाडूंनाही बजावले समन्स
Arrest | Representational Image | Photo Credits: File Photo

कर्नाटक प्रीमियर लीग (Karnataka Premier League) मधील 'बेलगावी पँथर्स' (Belagavi Panthers) क्रिकेट संघाच्या फ्रेंचायझीचा मालक अली असफाक थारा याला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अली असफाकवर आंतरराष्ट्रीय मॅच फ़िक्सिन्ग घोटाळ्याशी संबंधित असल्याचे आरोप आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगितले जात आहे की अली असफाक दुबईतील एका बुकीच्या संपर्कात होता. सह पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले की, अली असफाक याला अटक करण्याबाबत पुष्टी केली आहे. पोलीस सध्या याबाबत अधिक तपास करत आहेत आणि ते म्हणाले की त्यांच्याकडे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत.

यासह क्रिकेट लीगशी संबंधित 34 खेळाडूंनाही समन्स बजावले आहे. या खेळाडूंचीही सध्या चौकशी केली जात आहे. शिवाय, यामध्ये अशा अनेक खेळाडू या लीगमध्येही असे खेळाडू खेळात आहेत जे याआधी भारतीय क्रिकेट संघाचा भाग राहिले आहेत. दरम्यान, पाटील यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, 'संघाचा मालक सामन्यादरम्यान सट्टेबाजीत गुंतलेला होता. तो बेटिंग करत होता हे दाखवण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत.' थारावर आरोप आहे की ते दुबईस्थित आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुकीच्या संपर्कात होते. यासह ते अन्य संघातील खेळाडूंच्यादेखील संपर्कात होते. हे सर्व नियमांच्या विरुद्ध आहे आणि शुक्रवारी गुन्हे शाखेत थारा यांची चौकशी केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.

नुकत्याच पार पडलेल्या केपीएलच्या आठव्या सत्रात पँथर्सला क्वालिफायर 2 मध्ये हुबळी टायगरविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारताचा फलंदाज मनीष पांडे पँथर्स संघात सहभागी होणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.