
Rohit Sharma : रोहित शर्मा सध्या आयपीएल मध्ये ( IPL 2025) मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये रोहित फॉर्ममध्ये नाही. रोहित अलीकडेच आयपीएल 2025 दरम्यान हॉटस्टारचा भाग बनला. जिथे त्याने त्याच्या व्हायरल लाईन 'कोई गार्डन में घुमेगा' (IND vs ENG) मागील कहाणी सांगितली.
होस्टरवर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, हे विशाखापट्टणम कसोटी सामन्याबद्दल आहे. षटक संपले होते आणि खेळाडू बागेत चालल्यासारखे चालत होते. कोणालाही खेळाशी काहीघेण देण नव्हत. सगळे निश्चिंत होते. मी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होतो आणि दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजी करत होते. सामना खूपच नाजूक परिस्थितीत होता. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे होते. मी सकाळी सर्वांना सांगितले होते की आपल्याला थोडे अधिक काम करावे लागेल. पण खेळाडू मैदानावर मजा मारत होते.
रोहित पुढे म्हणाला की, त्या वेळी तो पुढे म्हणाला की मी दोन-तीन षटके पाहिली आणि नंतर म्हणालो की हे चालणार नाही, क्रिकेट असे खेळता येत नाही. सगळे फक्त खेळत होते. ज्यामुळे मला राग येत होता. मग मी सर्वांना असे करू नका असे समजावून सांगितले. सुरुवातीला चांगली भागीदारी सुरू होती आणि मला कोणत्याही किंमतीत विकेट घ्यायची होती. अशा वेळी, सर्वांनी मिळून कठोर परिश्रम करावे लागणार होते. पण मी पाहिले की सगळेच आपापल्या गोष्टींमध्ये व्यस्त होते. जे मला आवडले नाही. म्हणून मी तसे बोललो.
रोहित शर्माची कामगिरी निराशाजनक
रोहितने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली नाही. त्याने आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. रोहितने गेल्या 6 डावांमध्ये 26, 18, 17, 13, 8 आणि 0 धावा केल्या आहेत.