Afghanistan National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना (AFG vs NZ Test) खेळवला जाणार आहे. सोमवारपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ कसोटी फॉरमॅटमध्ये प्रथमच आमनेसामने येणार आहेत. अफगाणिस्तानचा संघ हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखाली तर न्यूझीलंडचा संघ टीम साऊदीच्या नेतृत्वाखाली असेल. या सामन्यात न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान, हशमतुल्ला शाहिदी, अजमतुल्ला उमरझाई यांच्यावर लक्ष असेल. हा सामना भारतात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू भारतात पोहोचले असून त्यांनी सरावही सुरू केला आहे.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना सोमवारी (09 सप्टेंबर 2024) होणार आहे. हा सामना ग्रेटर नोएडा येथील ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर खेळवला जाणार आहे.
तसेच हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10.00 वाजता सुरू होईल. नाणेफेक सकाळी 9.30 वाजता होईल. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना भारतात प्रसारित होणार नाही. कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर केले जाईल. (हे देखील वाचा: Dhruv Jurel New Record: ध्रुव जुरेलने एमएस धोनीच्या विक्रमाशी केली बरोबरी, विशेष क्लबमध्ये मिळवले स्थान)
Can Afghanistan spin their web around the visiting Kiwis minus their talisman Rashid Khan?
Watch the first ever Test between the two countries starting tomorrow only on #FanCode.#AfgvNZonFanCode pic.twitter.com/rCVjPjqGgs
— FanCode (@FanCode) September 8, 2024
न्यूझीलंड संघ
टीम साऊदी (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, टॉम लॅथम (उपकर्णधार), डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, बेन सियर्स. , केन विल्यमसन, विल यंग
अफगाणिस्तान संघ
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, अब्दुल मलिक, रहमत शाह, बहीर शाह मेहबूब, इक्रम अली खिल (विकेटकीपर), शाहीदुल्ला कमाल, अफसर झझाई (विकेटकीपर), अजमातुल्ला उमरझाई, झिया उर रहमान अकबर, शम्स उर रहमान, कैस अहमद, झहीर खान, निजात मसूद, खलील अहमद.