
Kolkata Knight Riders vs Punjab Kings, 44th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 44 वा सामना (IPL 2025) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) यांच्यात 26 एप्रिल (शनिवार) रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स (Eden Gardens, Kolkata) येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली असलेल्या पंजाब किंग्ज संघाने चांगली कामगिरी केली आहे. ते पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, अंजिक्य राहणेच्या खांद्यावर असलेला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघांना सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये पुढे जायचे आहे. (हे देखील वाचा: KKR vs PBKS, IPL 2025 44th Match Pitch Report: पंजाबविरुद्धच्या पराभवाचा बदला घेणार केकेआर, सामन्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य प्लेइंग 11 आणि पिच रिपोर्ट)
हेड टू हेड रिकॉर्ड (PBKS vs KKR Head To Head)
आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात एकूण 34 सामने खेळले गेले आहेत. या काळात, कोलकाता नाईट रायडर्सने वरचढ कामगिरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने 21 सामने जिंकले आहेत. तर, पंजाब किंग्जने फक्त 13 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही दुसरी भेट आहे. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने 16 धावांनी विजय मिळवला. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळवण्यात आला होता. या दरम्यान पंजाब किंग्जचा संघ जिंकला होता.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
कोलकाता नाइट रायडर्स: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
पंजाब किंग्ज : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को यान्सन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.