KKR vs MI, IPL 2019: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माला दंडाची शिक्षा
रोहित शर्मा (Photo Credits-Twitter)

KKR vs MI: कोलकाता येथील ईडन्स गार्डवर रविवारी (28 एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सामना खेळवण्यात आला. मात्र मुंबईचा संघाला काल पराभव स्विकारावा लागला आहे. या सामन्यात मुंबईच्या संघाला 34 धावांनी पराभव स्विकारावा लागला असून सामना संपवल्यावर कर्णधार रोहित शर्मा याला सामनाधिकाऱ्यांकडून दंड ठोठावण्यात आला आहे.

रोहित शर्माच्या मानधनामधील 15 टक्के रक्कम कापून घेतली गेली आहे. तर हॅरी गुर्नेच्या गोलंदाजी वेळी रोहित आऊट झाल्याचे अपील करण्यात आले. त्यावेळी पंच नितीन मेमन यांनी हे अपील ग्राह्य धरत रोहित आऊट झाल्याचे सांगितले. तर रोहितने पंचाकडे तिसऱ्यांदा दाद मागितली. मात्र तिसऱ्या वेळेस बॉल लेग स्टम्पला लागला असल्याचे दिसून आले. त्यावेळी 'अंपायर्स कॉल' नुसार रोहित आऊट झाला असल्याचे सांगितले. त्यावरुन रोहितने रागाच्या भरात स्टम्पवरील बेल्स बॅट्सने खाली पाडल्यानंतर नाराजीने मैदानाबाहेर जाताना दिसून आला.

(गौतम गंभीर यांची पूर्व दिल्ली येथे परवानगीविना सभा, निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश)

तर रोहितने सामनाधिकाऱ्यांसमोर आपली चूक कबुल केली आहे. कालचा सामना हा रोहितसाठी महत्त्वपू्र्ण होताच त्याचसोबत ईडन गार्डनवरील त्याचा शंभरावा सामना होता. मात्र मुंबईच्या संघाचा काल पराभव झाला.