गौतम गंभीर (फोटो सौजन्य- फेसबुक)

पूर्व दिल्ली (East Delhi) येथून भाजप पक्षाकडून उमेदवारी देण्याता आलेल्या गौतम गंभीर यांनी परवानगी न घेता प्रचारसभा घेतली. त्यामुळे  यांच्या विरुद्ध निवडणुक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता आयोगाने दिल्ली येथील निवडणूक अधिकाऱ्यांना गौतम यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे.

शुक्रवारी पूर्व दिल्ली येथून गौतम गंभीर यांनी परवानगी शिवाय प्रचारसभा घेतली. तसेच गंभीर यांचे नाव दोन ठिकाणी असल्याने दिल्लीतील न्यायालयात याबद्दल गुन्ह्याची तक्रार करण्यात आली होती. यावर आता 1 मे रोजी सुनावणी होणार आहे.(Lok Sabha Elections 2019: माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना भाजप कडून पूर्व दिल्लीतून उमेदवारी जाहीर)

तर गौतम यांच्याकडे दोन मतदान कार्ड असून एक राजेंद्र नगर आणि कराल बाग येथील आहे. त्यामुळे त्यांना 1 वर्षाची शिक्षा सुद्धा होऊ शकते.