
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील एकविसाव्या सामन्यात कोलकाता नाईट राईडर्सचा संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK Vs KKR) आमने- सामने येणार आहे. शेख जायद स्टेडिअमवर हा सामना पार पडणार आहे. एकीकडे चेन्नईच्या संघाने त्यांच्या मागील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध विजय मिळवल्यानंतर मैदानात उतरणार आहे. तर, कोलकाताच्या संघाला त्यांच्या मागील सामन्यात पराभवाचा तोंड पाहावे लागले होते. कोलकाता आणि चेन्नई यांच्यातील सामना अतिशय रोमांचक सामना होणार असून उद्याच्या ड्रिम इलेव्हन गेममध्ये कोणकोणत्या खेळाडूंची निवड करायची? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामुळे खालील माहिती अनेकांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
या हंगामात चेन्नईच्या संघाने पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी चेन्नईच्या संघाने 2 सामन्यात विजय मिळय मिळवला आहे. तर, 3 सामन्यात पराभूत झाले आहेत. दुसरीकडे, कोलकाताच्या संघाने चारपैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे आणि 2 सामन्यात पराभव झाला आहे. हे देखील वाचा-KKR Vs CSK, 20th IPL Match 2020: कोलकाता नाईट राईडर्सच्या संघासमोर चेन्नई सुपर किंग्जचे मोठे आव्हान
खेळाडू-
शुभमन गिल-
आयपीएलच्या तेराव्या हंगामात कोलकाताचा सलामीवीर शुभमन गिलने उत्कृष्ट कामगिरी करून चाहत्यांची मन जिंकली आहेत. शुभमन गिलने चार सामन्यात 152 धावा केल्या आहेत. शुभमन गिलचा फॉर्म चांगला असून ड्रीम 11 गेममध्ये त्याची निवड करणे व्यर्थ ठरणार नाही. तसेच चेन्नई विरुद्ध सामन्यात शुभमन चांगले प्रदर्शन करून दाखवेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
इयॉन मॉर्गन-
मुंबई इंडियन्स सामन्यात इयॉन मॉर्गन आक्रमक दिसला आहे. या सामन्यात इयॉन मॉर्गनने तडाखेबाज खेळी करत कोलकाताच्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने 29 चेंडूमध्ये 42 धावा ठोकल्या आहेत. ज्यात 2 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे.
फाफ डू प्लेसिस-
या हंगामाच्या सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आधारस्तंभ फाफ डू प्लेसिस फॉर्ममध्ये आहे. त्याने 5 सामन्यात 282 धावा केल्या आहेत. ड्रीम इलेव्हन गेममध्ये मोठ्या प्रमाणात फाफ डू प्लेसिसची निवड केली जात आहे. उद्याच सामन्यातही तो अशी कामगिरी बजावून दाखवण्याची शक्यता आहे.
आंद्रे रसल-
आंद्रे रसल हा कोलकाता संघाचा अतिशय आक्रमक फलंदाज आहे. मागील गेल्या काही सामन्यात रसलच्या बॅटीतून चांगल्या धावा बसरल्या नसून उद्याच्या सामन्यात तो आपल्या शैलीत खेळताना दिसेल, असा विश्वास टीम मॅनेजमेन्टला आहे.