KKR Vs CSK, 20th IPL Match 2020: कोलकाता नाईट राईडर्सच्या संघासमोर चेन्नई सुपर किंग्जचे मोठे आव्हान
CSK Vs KKR (Photo Credit: File Photo)

इंडियन प्रीमियर लीगच्या स्पर्धेत तीन किताब जिंकणारे चेन्नई सुपर (Chennai Super Kings) किंग्जच्या संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. मात्र, गेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला 10 विकेट्सने पराभूत केले होते. बुधवारी चेन्नई सुपर किंग्जचा सामना कोलकाता नाईट राईडर्ससोबत (Kolkata Knight Riders) शेख जायद मैदानात खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे आक्रमक फलंदाज शेन वॉट्सन फॉर्ममध्ये आला आहे. तर, चेन्नईचा सलामीवीर फाफ डू प्लेसीसने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात चांगले प्रदर्शन करून दाखवले आहे. यामुळे कोलकाता संघापुढे चेन्नईच्या संघाचे मोठे आव्हान असणार आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसिसने आक्रमक खेळी होती. एवढेच नव्हेतर या दोघांनी चेन्नईच्या संघाला 10 विकेट्स विजय मिळवून दिला होता. पंजाबच्या संघाने प्रथम फलंदाजी करत दिलेल्या 178 धावांचे लक्ष्य या दोघांनी 17.4 ओव्हरमध्येच पूर्ण केले होते. दुसरीकडे कोलकाताचा संघ या हंगामात डगमगताना दिसला आहे. कोलकाताचा फलंदाज शुभमन गिल फॉर्ममध्ये आहे. मात्र, कोलकाता संघाचा तडाखेबाज फलंदाज सुनील नारायण पाचही सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. गेल्या सामन्यात खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राहुल त्रिपाठीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. एवढेच नव्हेतर चेन्नई विरुद्ध सामन्यात राहुल त्रिपाठीला सुनील नारायण ऐवजी ओपनिंगला पाठवले जाण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- Kartik Tyagi Quick Facts: मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी बद्दल घ्या जाणून

तसेच इयोन मॉर्गनच्या फलंदाजी क्रमांकावरून संघावर टीकेची झोड उठवली जात आहे. मॉर्गनला फलंदाजी करण्यासाठी वरच्या क्रमांकावर पाठवले पाहिजे. तर, कोलाकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने स्वत: चौथ्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी आले पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. कोलकाताचा तडाखेबाज अष्टपैलू आंद्रे रसल सध्या फॉर्ममध्ये नसल्यामुळे संघाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. यामुळे उद्याचा सामना कोलकाता नाईट राईडर्ससाठी महत्वाचा ठरणार आहे.