World Test Championship 2021 Final: टीम इंडियासाठी WTC फायनलसाठी ही ठरू शकते सर्वात मोठी डोकेदुखी, न्यूझीलंड अष्टपैलूने केले उघड
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: IANS)

WTC 2021 Final: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) फायनल सामन्यासाठी अचूक इलेव्हन निवडणे ही भारत (India) आणि त्यांच्या संघ व्यवस्थापनासाठी मोठी डोकेदुखी ठरेल असा विश्वास न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोमने (Colin de Grandhomme) व्यक्त केला आहे. जून महिन्यात इंग्लंड येथे भारत-न्यूझीलंड संघात पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल (World Test Championship Final) सामना रंगणार असून विजयी संघाला पहिल्या विजेतेपदाचा मान मिळवेल. कोलिन डी ग्रॅन्डहोमे सुचवले की त्यांच्याकडे (टीम इंडिया) असलेल्या कौशल्याच्या भरभराटामुळे भारताला त्यांचा प्लेइंग इलेव्हन निवडणे कठीण होईल. भारत-न्यूझीलंड (IND-NZ) संघातील टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लॉर्ड्स येथे खेळला जाणार होता पण नंतर तो साउथॅम्प्टन (Southampton) येथे हलवण्यात आला. (World Test Championship Final 2021: टीम इंडिया सोबत WTC फायनलसाठी इंग्लंडला रवाना होऊ शकतात न्यूझीलंड खेळाडू, जाणून घ्या नक्की कारण)

आयसीसीनुसार न्यूझीलंड अष्टपैलू म्हणाला, “त्यांच्याकडे असलेल्या खेळाडूंच्या संख्येमुळे ते सर्व विभाग कवर करू शकतात कारण यंदाच्या त्यांच्याकडे चांगले सीम गोलंदाज आणि स्पिनर मिळाले आहेत, त्यामुळे मला वाटते की त्यांच्यासाठी सर्वात कठीण गोष्ट इलेव्हनची निवडण्याची असेल.” गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या खेळाडूंना असंख्य दुखापत झाल्याने टीम इंडियाच्या कौशल्यात मोठी घट पहाया मिळत आहे. यंदा वर्षाच्या सुरूवातीस बहुतेक खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात शानदार कामगिरी बजावली होती. परिणामी, प्रत्येकजण फिट झाल्यावर आणि जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असल्यास खेळाडूंची निवड करणे भारतीय संघासाठी अडचण होईल.

ऑस्ट्रेलियामधील शानदार विजयानंतर भारताने टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दावेदारी मजबूत केली होती. त्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडवर घरच्या कसोटी मालिका जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 12 विजय, 4 पराभव आणि 1 ड्रॉ बरोबर भारताने चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. भारतीय संघाने वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावरील कसोटी मालिका जिंकल्या तर विदेश दौऱ्यावर त्यांना फक्त ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवता आला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 3-1 ने पराभव करून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.