World Test Championship Final 2021: टीम इंडिया सोबत WTC फायनलसाठी इंग्लंडला रवाना होऊ शकतात न्यूझीलंड खेळाडू, जाणून घ्या नक्की कारण
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

World Test Championship Final 2021: आयपीएलमध्ये (IPL) खेळणारे न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेटपटू जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी (WTC Final) भारतीय क्रिकेटपटूंसमवेत इंग्लंडला (England) रवाना होऊ शकतात. आयपीएल खेळणार्‍या न्यूझीलंडच्या दहा खेळाडूंमध्ये केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, काईल जेमीसन आणि मिचेल सॅटनर यांचा समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये सक्तीच्या क्वारंटाईन नियमांमुळे आयपीएलनंतर खेळाडूंचे मायदेशी जाणे संभव नसल्याने खेळाडू थेट इंग्लंडसाठी रवाना होण्याची शक्यता दिसत आहे. इंग्लंड टीम विरोधात 2 जूनपासून होणार्‍या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर करण्यात आला आहे. त्यांनतर 18 जूनपासून भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी 15 सदस्यीय संघ निवडला जाईल. न्यूझीलंड आणि भारतीय संघात साउथॅम्प्टन (Southampton) येथे टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा महामुकाबला रंगणार आहे. (ICC World Test Championship Final 2021: टीम इंडियाची लॉर्ड्स वारी, ऑस्ट्रेलियाचं स्वप्न चक्काचूर करत मिळालं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट)

न्यूझीलंड क्रिकेट प्लेयर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी हीथ मिल्स म्हणाले,“ते घरी परत येऊ शकत नाहीत कारण त्यांना दोन आठवडे क्वारंटाईन राहावे लागेल. राऊंड रॉबिन फेरीपर्यंत ते भारतात आहेत. त्यानंतर, आपण अखेरच्या फेरीपर्यंत राहू शकतात.” stuff.co.nz शी बोलताना त्यांनी म्हटले की, “बरीच उड्डाणे नसल्यास परत येणे शक्य होणार नाही. आम्ही बीसीसीआय आणि आयसीसीच्या संपर्कात असलेल्या न्यूझीलंडच्या क्रिकेटशी बोलत आहोत.” ते म्हणाले की, आयपीएल खेळणार्‍या न्यूझीलंड क्रिकेटपटू भारतातील उड्डाणे रद्द करण्याबाबत चिंतीत आहेत पण घरी परत येण्याचे संकेत कोणी दिले नाहीत. 11 एप्रिल रोजी ही उड्डाणे रद्द करण्यात आली असून बुधवारी रात्रीपासून पुन्हा सुरू होतील. मिल्स म्हणाले की, आयपीएलच्या बायो बबलमध्ये खेळाडूंना सुरक्षित वाटत आहे.

ते म्हणाले, “हॉटेलमध्ये चार संघ असतात आणि हॉटेल लॉकडाउन आहे. एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना त्यांना धोका असतो परंतु सेफ्टी प्रोटोकॉलचा संपूर्ण पाठपुरावा केला जात आहे. ते पूर्णपणे सुरक्षित बबलमध्ये आहेत.” आयपीएलच्या वेगवेगळ्या फ्रँचायझींमध्ये न्यूझीलंडचे सात सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत. याकडे स्टीफन फ्लेमिंग (चेन्नई), ब्रेंडन मॅक्युलम (कोलकाता), माईक हेसन (बेंगलोर), शेन बाँड (मुंबई), जेम्स पाममेंट (मुंबई), काइल मिल्स (कोलकाता), क्रिस डोनाल्डसनचा (कोलकाता) समावेश आहेत.