भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. श्रेयस आपल्या ट्रेंडी पोस्ट आणि चाहत्यांमधील मजेदार कमेंट्समुळे ओळखला जातो. शुक्रवारी बीसीसीआयने (BCCI) इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या विराट कोहली (Virat Kohli) फोटोवर प्रतिक्रिया देताना श्रेयसरने तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे प्रदर्शन केले. सध्या वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्वच्या मैदानावर भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मध्ये दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टेस्ट सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या नाणेफेकापूर्वी बीसीसीआयने विराटचा एक फोटो पोस्ट केला होता आणि त्याला कॅप्शन दिले: “चला आपण आपले विचार ठेवूया आणि कॅप्शन देऊया? सर्वात चांगले येथे सादर केले जाईल." फोटोमध्ये कोहली इंडिया ब्लेझर घालून वेलिंग्टनमध्ये नाणेफेक करण्यापूर्वी 'नृत्य स्थितीत' उभे असल्याचे दिसून येत आहे. (IND vs NZ 1st Test: रिषभ पंतला रिद्धिमान साहा ऐवजी प्लेयिंग XI मध्ये खेळण्याची संधी दिल्याने संतप्त Netizens ने विराट कोहलीला फटकारले, पाहा Tweets)
बीसीसीआयने शेअर केलेल्या विराटच्या या फोटोवर श्रेयस 'के घुंघरू टूट गए' हे हिंदी गाण्याची ओळ कॅप्शन म्हणून लिहिली. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठीश्रेयसला संघात स्थान देण्यात आले नसल्याने सध्या तो क्रिकेटपासून दूर आनंद घेत असल्याचे दिसत आहे. भारताच्या फलंदाजीचा भविष्य म्हणून ओळखला जाणारा श्रेयस मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये गेल्या 8 महिन्यांत मधल्या फळीतील मुख्य फलंदाज ठरला आहे. पाहा बीसीसीआयची पोस्ट:
View this post on Instagram
श्रेयसची प्रतिक्रिया:
याआधी शुक्रवारी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जैमीसनने आपल्या कसोटी कारकीर्दीची धमाकेदार सुरुवात केली. त्याने भारताचा कर्णधार कोहलीसह तीन गडी बाद केले. न्यूझीलंडने हरित बेसिन रिझर्व्ह खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.जैमीसनऐवजी चहाच्या वेळेपर्यंत ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.