
Kashmir Premier League 2021 Schedule: स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच, काश्मीर प्रीमियर लीगच्या (Kashmir Premier League) उद्घाटन आवृत्तीबद्दल बरीच चर्चा झाली आणि वाद निर्माण झाले आहेत. पण सर्व वादांची पर्वा न करता स्पर्धा 6 ऑगस्ट, शुक्रवारी आयोजत करण्यात आलेल्या पहिल्या सामन्याच्या नियोजनाप्रमाणे पुढे जाईल. दरम्यान वादाच्या भोवती सर्व चर्चा सेट करून या नवीन टी-20 स्पर्धेबाबत सर्व आवश्यक माहिती जाणून घ्या. काश्मीर प्रीमियर लीग स्पर्धेत सहा संघ खेळताना दिसणार आहे जी मुझफ्फराबाद (Muzaffarabad) येथे आयोजित केली जाईल. अंतिम सामना 17 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. (PoK League: क्रिकेटर-भाष्यकार मॉन्टी पानेसरची पाकिस्तानच्या विवादित KPL लीगमधून माघार, म्हणाले- ‘मला या सर्वांच्यामध्ये पडायचे नाही’)
मुझफ्फराबाद टायगर्स, कोटली लायन्स, बाग स्टॅलियन्स, ओव्हरसीज वॉरियर्स, मीरपूर रॉयल्स आणि रावलकोट हॉक्स, असे सहा संघ पहिले विजेतेपद पटकावण्यासाठी स्पर्धा करतील. या स्पर्धेत एकूण 19 सामने खेळले जातील. पाहा स्पर्धेचे संपूर्ण शेड्युल.
Clear your schedules❕
The Match Fixtures for the inaugural season of KPL is here 🗓#KPL21 #KheloAazadiSe #SRGKPL pic.twitter.com/djaryqY8F0
— Kashmir Premier League (Official) (@kpl_20_) August 2, 2021
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू हर्शल गिब्सचे एक ट्विट सोशल मीडियात व्हायरल झाल्याने या स्पर्धेभोवती वाद निर्माण झाला. त्यानंतर अनेक अहवालांनी सूचित केले की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वादग्रस्त क्षेत्रातील टी-20 स्पर्धेत सहभागी होण्यापासून खेळाडूंना 'चेतावणी' दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याची दखल घेत म्हटले की हे खेळाच्या विरोधात आहे. बीसीसीआयने दिलेल्या 'चेतावणी'मुळे अनेक परदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मोंटी पनेसर. पनेसरने ट्विटर पोस्टद्वारे आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, बीसीसीआयने विरोध केला असला तरी हर्शल गिब्स आणि तिलकरत्ने दिलशान या स्पर्धेत सहभागी होत आहेत.