Vijay Hazare Trophy 2025: विजय हजारे ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यात वडोदरा येथे खेळला जात आहे जिथे महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. विदर्भाने 50 षटकांत 3 विकेट गमावून 380 धावा केल्या आहेत. ध्रुव शोरे आणि यश राठोड दोघेही शतके ठोकून बाद झाले. ध्रुवने 114 धावा आणि यशने 116 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार करुण नायर यांने आक्रमक पारी खेळली. त्यांने 44 चेंडूत 88 धावा केल्या या खेळीत 5 षटकार आणि 9 चौकाराचा समावेश होता. (हेही वाचा - Team India New Batting Coach: टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकामध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआय करू शकते मोठी घोषणा)
पाहा पोस्ट -
KARUN NAIR HAS AN AVERAGE OF 752 IN VIJAY HAZARE 2025 🥶 pic.twitter.com/tROeGXYMdj
— Johns. (@CricCrazyJohns) January 16, 2025
भारतीय फलंदाज करुण नायर विजय हजारे ट्रॉफी 2024-25 मध्ये एकामागून एक स्फोटक खेळी करताना दिसत आहे. आता विदर्भाचा कर्णधार नायरने महाराष्ट्राविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या उपांत्य सामन्यात स्फोटक खेळी करत आपली फलंदाजीची सरासरी 752 पर्यंत नेली आहे. याआधी त्याने पाच शतके ठोकली आहेत.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे करुण नायर पुन्हा एकदा नाबाद परतला आहे. नायरने आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफीच्या 7 डावांमध्ये फलंदाजी केली आहे ज्यामध्ये तो 6 वेळा नाबाद परतला आहे. महाराष्ट्राविरुद्धच्या उपांत्य सामन्यात नायरला शतक करता आले नाही पण त्याने 88* धावा करून संघासाठी महत्त्वाची खेळी केली.