भारतीय क्रिकेट संघाला पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले होते. यातच कपिल देव यांच्याबद्दल एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी (Aangioplasty) शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून शस्त्रक्रियेनंतर त्यांचा रुग्णालयातील पहिला फोटो समोर आला आहे. ज्यात ते सुखरुप असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, त्यांनीदेखील एक ट्विट करत आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
कपिल देव यांना छातीत वेदना जाणवू लागल्याने शुक्रवारी त्यांना दिल्लीतील फोर्टीस रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर त्वरीत अॅंजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर कपिल देव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कपिल देव यांनीदेखील ट्वीट करून सांगितले आहे की, "मी यातून लवकरच पूर्णपणे बाहेर येईन. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल धन्यवाद." हे देखील वाचा- KKR vs DC, IPL 2020: श्रेयस अय्यरचा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय; पृथ्वी शॉच्या जागी अजिंक्य रहाणेचा समावेश
कपिल देव यांचे ट्विट-
— Kapil Dev (@therealkapildev) October 23, 2020
कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 225 एकदिवसीय तर, 131 कसोटी सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्यांनी 3 हजार 783 धावा केल्या असून 253 विकेट्स पटकावले आहेत. तसेच कसोटी सामन्यात त्यांनी 5 हजार 248 धावा केल्या आहेत. तर, 434 विकेट्स घेतले आहेत. भारतीय क्रिकेट संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1982 मध्ये पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध अंतिम सामना खेळण्यात आला होता. तसेच त्यांनी आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 1994 मध्ये फरीदाबाद येथे खेळला होता.