Kagiso Rabada (Photo Cedit- X)

Kagiso Rabada  Record in WTC Final: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच WTC फायनल 2025 मध्ये चेंडूने धुमाकूळ घातला. रबाडाने शानदार गोलंदाजी केली आणि लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर 5 विकेट्स घेण्याचा मोठा पराक्रम केला. अॅलन डोनाल्ड आणि मखाया एन्टिनी नंतर लॉर्ड्सवर एकापेक्षा जास्त वेळा पाच विकेट्स घेणारा तो तिसरा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज बनला आहे. WTC इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत रबाडाने भारताच्या जसप्रीत बुमराहची बरोबरी केली. रबाडाच्या आता WTC मध्ये 156 विकेट्स आहेत. WTC फायनलच्या दुसऱ्या डावात 1 विकेट घेताच रबाडाने बुमराहला मागे टाकले आणि WTC मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज बनेल.

WTC मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

नाथन लायन - 210

पॅट कमिन्स - 200

आर. अश्विन - 191

पॅट कमिन्स - 172

जसप्रीत बुमराह - 156

कागिसो रबाडा - 156

WTC फायनलमध्ये 5 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज

कागिसो रबाडा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पाच विकेट्स घेणारा जगातील दुसरा गोलंदाज बनला आहे. त्याच्या आधी, हा पराक्रम न्यूझीलंडच्या काइल जेमिसनने 2021 च्या WTC फायनलमध्ये केला होता, जेव्हा त्याने भारताविरुद्ध 31 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. आता रबाडानेही या खास क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. इतकेच नाही तर रबाडा आता कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज बनला आहे. त्याने अ‍ॅलन डोनाल्डला मागे टाकत चौथे स्थान पटकावले आहे. रबाडाने आतापर्यंत कसोटीत 331 विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया स्वस्तात बाद झाला

रबाडाच्या धोकादायक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त 212 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडून ब्यू वेबस्टरने सर्वाधिक धावा केल्या. वेबस्टरने 72 धावांची खेळी खेळली. त्याने त्याच्या डावात 11 चौकार मारले. स्टीव्ह स्मिथने 66 धावा केल्या. स्मिथने 10 चौकार मारले. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने 15.4 षटकांत 51 धावांत 5 बळी घेतले तर मार्को जॅन्सनने 3 बळी घेतले. केशव महाराज आणि एडेन मार्कराम यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.