युवराज सिंह, रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

10 जून, 2019 रोजी म्हणजेच मागील वर्षी टीम इंडियाचा प्रसिद्ध अष्टपैलू युवराज सिंह (Yuvraj Singh) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्या निवृत्तीला एक वर्ष पूर्ण झाल्याने सोशल मीडियावर यूजर्सने #MissYouYuvi हॅशटॅग ट्रेंड केले. चाहत्यांना युवीची आठवाण सतावत होती आणि चाहत्यांचे प्रेम पाहून युवी देखील भारावून गेला. अशा परिस्थितीत युवीने आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ मेसेज जारी केला. ज्यावर सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आपली प्रतिक्रिया दिली. युवीने आणखी थोडा खेळला पाहिजे अशी रोहितची इच्छा होती. याच्यावर युवीनेही प्रतिक्रिया दिली. "आज तुमच्याकडून मिळालेलं प्रेम पाहून मी भारावून गेलो. आजचा दिवस खास आणि अविस्मरणीय केल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही नेहमीच मला पाठिंबा दिला आहे, विशेषतः माझ्या कठीण काळात..." यावर रोहित म्हणाला की, "आपण दोघांनी आजवर अनेक अविस्मरणीय क्षण घालवले आहेत. कदाचित तू आणखी काही वर्ष खेळला असता." (#MissYouYuvi: 'सिक्सर किंग' युवराज सिंह याच्या निवृत्तीच्या एका वर्षानिमित्त सोशल मीडियावर यूजर्स भावुक, पाहा Tweets)

रोहितच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत युवी म्हणाला की तो जितकी वर्ष खेळला, स्वतःच्या जीवावर खेळला. युवीने लिहिलं,"भाव, जितकी वर्ष खेळलो, ती स्वतःच्या जीवावर. तुझ्यातही मी तीच आग पाहत आहे. पण, एक वेळ अशी येईल जेव्हा लोकांचा तुझ्यावरील विश्वास उडेल, पण तू स्वतःवरील विश्वास खचू देऊ नकोस. हार मनू नकोस आणि किती लांब पल्ला गाठलास याचा विचार कर! प्रयत्न करत राहा."

युवीने भारताच्या 2007 टी-20 आणि 2011 वनडे वर्ल्ड कप विजयाचा मुख्य भूमिका बजावली होती. युवीने 2017 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि मागील वर्षी वर्ल्ड कप दरम्यान निवृत्ती जाहीर केली. युवीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला चौथ्या स्थानावर संघर्ष करावा लागला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी भारताला अनेक वर्षांपासून योग्य पर्याय मिळाला नव्हता, पण आता श्रेयस अय्यरच्या खेळाने आता तो प्रश्नही दूर झालेला दिसत आहे.